मुंबई-गोवा महामार्गावर कारची कंटेनरला धडक; ४ जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर कारची कंटेनरला धडक; ४ जण जखमी

खेड : Bharat Live News Media वृत्‍तसेवा मुंबई-गोवा राष्‍ट्रीय महामार्गावर आज (मंगळवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास लोटे औद्योगिक वसाहत परिसरात भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वागनोर मोटारीने विनती कंपनी समोर रस्त्यावर उभ्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात .मोटारीतून प्रवास करणारे चारजण गंभीर जखमी झाले आहेत.
मोटार चालक गंभीर जखमी असून, जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. लोटे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रूग्‍णालयात दाखल केले.
हेही वाचा : 

Weather Update | पारा घसरला : राज्यातील या जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’

दिल्ली-लखनौ महामार्गावर भरधाव कार दुभाजक ओलांडून ट्रकला धडकली; ६ जणांचा मृत्यू

बुद्धिप्रामाण्यवादी छत्रपती संभाजी महाराज