चंद्रपूर : महाराष्ट्र सिमेलगतच्या साडेबारा गावातील नागरिकांचे तेलंगणात मतदान

चंद्रपूर : महाराष्ट्र सिमेलगतच्या साडेबारा गावातील नागरिकांचे तेलंगणात मतदान

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (दि.१४) मतदान झाले. मतदानात महाराष्ट्र सिमेलगतच्या साडेबारा गावातील नागरिकांनी तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी मतदान करणाऱ्या मतदारांनी सोमवारी (दि.१३) दुसऱ्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
महाराष्ट्रासह तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि.१३) चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवरील साडेबारा गावातील नागरिकांवर दोन्ही सरकार आपापला दावा करतात. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत साडेबारा गावातील नागरिक दोन्ही ठिकाणी मतदानाचा हक्क बजावतात. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर ‘१४ मे’ ला महिनाभरातच एकाच निवडणुकीत आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील ‘जिवती’ या दुर्गम तालुक्यातील साडेबारा गावे तेलंगणा सीमेला लागलेली आहेत. या गावांवर तेलंगणा आपला अधिकार सांगत आला आहेl. पण ही गावे मूळ महाराष्ट्रात आहेत. दूरवर असलेली ही गावे नेहमीच विकासापासून, शासकीय योजनांपासून दूर आहेत. याचा फायदा घेत तेलंगणा सरकारने या लोकांना रेशन कार्ड, मतदान पत्र, अंगणवाडी, शाळा, वीज अशा सुविधा पुरविलेल्या आहेत. येथील लोकांना स्वतःचा फायदा दिसत असल्याने ते दोन्ही राज्यातील स्वस्त धान्य, घरकुल सह अन्य योजना किंवा इतर योजना असतील, याचा लाभ ते घेत आहेत.
तेलंगणातील प्रत्येक निवडणुकीत येथील लोक सहभाग घेतात. या साडेबारा गावात एकूण ५ हजार ११७ मतदार आहेत. या प्रत्येकाकडे दोन मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, आधार आहे. आज तेलंगणातील आदिलाबाद लोकसभा मतदारसंघात गावकऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये जिवती तालुक्यातील येसापूर, अंतापूर , पद्मावती, इंदिरानगर, पलसगुडा, लेंडीगुडा, वेलापठार, नारायणगुडा, परमडोली, शंकरलोधी, महाराजगुडा, लेंडीजाडा , कोठा आदींचा समावेश आहे. दोन्हीं राज्यातील साडेबारा गावातील नागरिकांनी सकाळपासून मतदानासाठी केंद्रांवर गर्दी केली.
हेही वाचा :

Jalgaon | Raver Lok Sabha : 38 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद, इतके झाले मतदान
Chandrasekhar Bawankule | ४ जूननंतर राज्यातील दोन पक्ष संपणार : बावनकुळे यांची टीका
काय म्हणता, हजार रुपयातही निवडणूक लढवता येऊ शकते!