सोरेन यांना तृर्तास दिलासा नाही, आव्हान याचिकेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ‘ईडी’च्या अटकेला आव्हान देणाऱ्या झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर आज (दि.१३ मे) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सोरेन यांच्या आव्हान याचिकेवर तुर्तास तरी दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे हेमंत सोरेन यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवीरल सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. …

सोरेन यांना तृर्तास दिलासा नाही, आव्हान याचिकेवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : ‘ईडी’च्या अटकेला आव्हान देणाऱ्या झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर आज (दि.१३ मे) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सोरेन यांच्या आव्हान याचिकेवर तुर्तास तरी दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे हेमंत सोरेन यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवीरल सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. दरम्यान न्यायालयाने सोरेन यांच्या अटक प्रकरणात ईडीला  कारवाई संदर्भात उत्तर देण्‍यासाठी नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी शुक्रवार १७ मे रोजी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
जमीन घोटाळा प्रकरणी ‘ईडी’ने हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अटक केली होती. ईडीच्‍या अटकेला आव्‍हान देणारी याचिका सोरोन यांनी झारखंड उच्‍च न्‍यायालयात दाखल केली होती. ३ मे २०२४ रोजी ती फेटाळण्‍यात आली. या निकालाला आव्‍हान देणारी याचिका त्‍यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल केली होती. सोरेन यांच्‍यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्‍तीवाद केला. न्यायालयाने सोरेन यांच्या अटक प्रकरणात ईडीला  कारवाई संदर्भात उत्तर देण्‍यासाठी नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी शुक्रवार १७ मे रोजी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Supreme Court Seeks ED’s Response On Hemant Soren’s Plea Challenging Arrest, Lists On May 17 |@DebbyJain #HemantSoren #Jharkhand #SupremeCourt #EDhttps://t.co/gouJmaY1F1
— Live Law (@LiveLawIndia) May 13, 2024

काय आहे प्रकरण?
हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. माजी मुख्यमंत्री सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयाने सोरेन यांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीला आणखी एका आठवड्याची मुदत दिली होती. यापूर्वी 27 एप्रिल रोजी रांची येथील विशेष पीएमएलए न्यायालयाने सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. हेमंत सोरेन यांचे काका राम सोरेन यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. सोरेनने आपल्या काकांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडे 13 दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता. याविराेधात हेमंत साेरेन यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली हाेती.
हेही वाचा:

Hemant soren : हेमंत सोरेन यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली, पण ‘यासाठी’ दिली परवानगी
Hemant Soren: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या काकांचे निधन; न्यायालयाने जामीन नाकारला
Hemant Soren : ईडीच्या कारवाईविरोधात हेमंत सोरेन यांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण; निर्णय राखून ठेवला