रोहित-हार्दिक नव्‍हे, ‘मुंबई’साठी सेहवागने सुचवली ‘या’ खेळाडूंची नावे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या आयपीएल हंगामात दरवर्षी चर्चेच्‍या केंद्रस्‍थानी असणारा मुंबई इंडियन्‍स संघाची कामगिरी नामुष्‍कीजनक राहिली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता पुढील आयपीएल हंगामासाठी ( IPL 2025 ) लिलावापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेट वीरेंद्र सेहवागने मुंबई संघ व्यवस्थापनाला एक सल्ला दिला आहे. त्‍याने केवळ मुंबई संघातील …
रोहित-हार्दिक नव्‍हे, ‘मुंबई’साठी सेहवागने सुचवली ‘या’ खेळाडूंची नावे

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या आयपीएल हंगामात दरवर्षी चर्चेच्‍या केंद्रस्‍थानी असणारा मुंबई इंडियन्‍स संघाची कामगिरी नामुष्‍कीजनक राहिली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता पुढील आयपीएल हंगामासाठी ( IPL 2025 ) लिलावापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेट वीरेंद्र सेहवागने मुंबई संघ व्यवस्थापनाला एक सल्ला दिला आहे. त्‍याने केवळ मुंबई संघातील आताच खेळाडूंपैकी दोनच नावे त्‍याने कायम ठेवली आहेत. विशेष म्‍हणजे हे खेळाडू रोहित शर्मा किंवा हार्दिक पंड्या नाहीत. जाणून घेवूया सेहवाग याने या म्‍हटलं आहे याविषयी…
सेहवाग नेमकं काय म्‍हणाला?

वीरेंद्र सेहवागने मुंबई संघ व्यवस्थापनाला सल्ला देताना म्‍हटलं आहे की, आमिर खान आणि सलमानला एकाच चित्रपटासाठी आणले तर त्याचा अर्थ असा नाही की तो चित्रपट हिट होईल. तुम्हाला परफॉर्म करावे लागेल. स्क्रिप्टमध्ये काहीतरी असावे लागेल. मुंबईच्या टीममधली मोठी नावं बघा, पण जिंकण्यासाठी सगळ्यांनाच कामगिरी करावी लागेल. रोहितने शतक झळकावले तरीही या सामन्‍यात संघाचा पराभव झाला. उर्वरित सामन्यांमध्ये त्याने कशी कामगिरी केली?, असा सवालही त्‍याने केला.
सूर्यकुमार यादव आणि बुमराह या दोघांनाच कायम ठेवण्याची खात्री
ईशान किशन संपूर्ण मोसमात पॉवरप्लेमध्ये बाहेर राहिला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव या दोनच खेळाडूंना कायम ठेवण्याची खात्री आहे. तिसऱ्या आणि चौथ्या खेळाडूंनाही त्यांनी कायम ठेवले तर ते पाहण्यासारखे असेल, असेही सेहवागने म्‍हटले आहे.
रोहित आणि सूर्याला फटकारले
चर्चेवेळी वीरेंद्र सेहवागने मुंबई इंडियन्स (MI) फलंदाजी जोडी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांची कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या IPL 2024 सामन्यात भेट म्हणून जास्त वेळ दिल्याबद्दल आक्षेप घेतला. कोलकाताविरुद्धच्या पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात रोहितने 24 चेंडूत 19 धावा केल्या, तर सूर्याने 14 चेंडूत 11 धावा केल्या. रोहित शर्मा किंवा सूर्यकुमार यादव असाल, पण जर तुम्ही गोलंदाजाचा आदर करू शकत नसाल तर किमान चेंडूचा आदर करा. रोहित शर्मा ज्या चेंडूवर आऊट झाला तो कमकुवत चेंडू नव्हता. रोहित आणि सूर्यकुमार हे महान खेळाडू आहेत यात शंका नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही चांगले चेंडूही मारले पाहिजेत, असा सल्‍लाही सेहवागने दिला.
हेही वाचा : 

IPL 2024 : हार्दिक पंड्याच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, मुंबई इंडियन्सच्या 17 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असे’ घडले
IPL 2024 Playoff : प्लेऑफची लढत रोमांचक, शिल्लक 3 जागांसाठी 7 संघांमध्ये शर्यत, जाणून घ्या समीकरण
IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, कर्णधार ऋषभ पंत एका सामन्यासाठी निलंबित