IPL 2024 : चेन्नईसमाेर विजयासाठी 142 धावांचे लक्ष्य
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) स्पर्धा पाच वेळा विजेता संघ चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सामना आज
(दि.१२ मे) राजस्थान रॉयल्सशी आहे. गुणतालिकेत दुस-या स्थानावर असलेल्या राजस्थानचे लक्ष हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्यावर असेल. तर हा सामना चेन्नईसाठी ‘करा किंवा मरा’ असा आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नई संघाच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. सध्या चेन्नई संघ 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. या संघाला आता उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहेत.
चेन्नईसमाेर विजयासाठी 142 धावांचे लक्ष्य
सिमरजित सिंग आणि तुषार देशपांडे यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सला 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 141 धावांवर रोखले. राजस्थानकडून रियान परागने 35 चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या. चेन्नईकडून सिमरजीतने तीन, तर तुषारने शेवटच्या षटकात दोन बळी घेतले. राजस्थानने २० षटकांमध्ये 5 गडी गमावत 142 धावांपर्यंत मजल मारली. आता विजयासाठी चेन्नईला142 धावांची आवश्यकता आहे.
सिमरजीत सिंगचा भेदक मारा
पॉवर प्लेमध्ये चेन्नईच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना नियंत्रणात ठेवले. राजस्थानने सहा षटकांनंतर बिनबाद 42 धावा केल्या. सिमरजीत सिंगने यशस्वी जैस्वालला बाद करून राजस्थानला पहिला धक्का दिला. यशस्वी 21 चेंडूत 24 धावा केल्या. सिमरजीत सिंगने सलामीवीर जोस बटलरला बाद करत राजस्थानला आणखी एक धक्का दिला. बटलर 25 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. सुरुवातीच्या धक्क्यानंतर राजस्थानची धावगती मंदावली. राजस्थानने 11 षटकानंतर २ गडी गमावत 68 धावा केल्या. सिमरजीत सिंगने चेन्नईला तिसरे यश मिळवून देत राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ससामन 19 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. या सामन्यातील सिमरजीतची ही तिसरी विकेट ठरली.
Impressive bowling by #CSK bowlers 🙌
Tushar Deshpande with 2 wickets in the final over ✌️
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #CSKvRR | @ChennaiIPL pic.twitter.com/R06yp0KQjB
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2024