खूपच काळजी घ्या…; अर्जुन कपूरची ‘मदर्स डे’ ला भावूक पोस्ट (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी ‘मदर्स डे’ सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावेळी काहींजण स्वत: आईला आपआपल्या कामातून वेळ काढून शुभेच्छा देतात तर काही जण आईच्या आठवणीने भा‍वूक होतात. आजच्या दिवशी सर्वजण आपआपल्या आईचे तोंडभरून कौतुक करत आहेत. या खास ‘मदर्स डे’ च्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूरला देखील त्याच्या आईची …
खूपच काळजी घ्या…; अर्जुन कपूरची ‘मदर्स डे’ ला भावूक पोस्ट (video)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी ‘मदर्स डे’ सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावेळी काहींजण स्वत: आईला आपआपल्या कामातून वेळ काढून शुभेच्छा देतात तर काही जण आईच्या आठवणीने भा‍वूक होतात. आजच्या दिवशी सर्वजण आपआपल्या आईचे तोंडभरून कौतुक करत आहेत. या खास ‘मदर्स डे’ च्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूरला देखील त्याच्या आईची आठ‍वण काढली आहे. आठवणीने भावनिक होवून त्याने नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अर्जून कपूरची आईसाठी भावूक पोस्ट
आईची खूपच काळजी घेण्याचा सल्ला
अर्जून कपूर सध्या एकटाच घरी आहे

अभिनेता अर्जून कपूरने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो आई मोना शौरी कपूरच्या आठ‍वणींने भावनिक झाल्याचे दिसत आहे. यात तो म्हणतोय की “आज रविवारी दिनांक १२ मे रोजी मदर्स डे आहे. मी हा व्हिडिओ शेअर करतोय कारण, मला आजच्या दिवशी माझ्या आईची आठ‍वण येत आहे. मी लहान होतो तेव्हा मला माझी आई आंघोळ घालण्यापासून सर्वकाही करायची. ती जेव्हा ज‍वळ असायची तेव्हा आमच्या जवळ जग असायचे. आज ती आम्हाला सोडून गेली आहे. यानंतर आम्हाला तिची सतत आठ‍वण येत आहे. तिची जागा कोणीच भरून काढू शकत नाही.”
यापुढे तो म्हणाला की “आईला हलक्यात घेवू नका, ज्याच्याजवळ आई आहे तो भाग्यवान आहे. आज मी एकटा असल्याने तिची उणीव भासत आहे. माझी बहीण घरी नाही, ती सुट्टीवर गेली आहे त्यामुळे मी घरी एकटाच आहे. आई-वडिलांची खूपच काळजी घ्या. त्यांच्यावर प्रेम करा आणि आदर करा. शक्य तितकी काळजी घ्या.”
यासोबत अर्जुनने सर्व महिलांना आणि चित्रपट, नाटक, मालिकेत आईची भूमिका साकारणाऱ्या सर्व मातांना ‘मदर्स डे’च्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत त्याने आई असणाऱ्यांना त्याच्या चाहत्यांना आईची काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. अर्जुनची आई मोना शौरी कपूर या जगात नाही. २०१२ मध्ये मोना कपूर यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून अर्जूनला आईची आठ‍वण येत असते.

 

View this post on Instagram

 
A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)