सरदार जलाशयातून प्रवास, मतदान केंद्र गाठण्यासाठी कसरत

नंदुरबार : पुढारी ऑनलाइन डेस्क नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी उद्या सोमवार (दि.१३) रोजी मतदान होत आहे. या मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक राहीला आहे. तर नर्मदा काठावरील मतदान केंद्रांवर पोलीस पथक शनिवारी (दि.११) विविध अडचणी पार करत रवाना झाले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल डोंगराळ तसेच नर्मदा नदीकाठाने व्यापलेला परिसर आहे. येथील विकास अजूनही खुंटलेला …

सरदार जलाशयातून प्रवास, मतदान केंद्र गाठण्यासाठी कसरत

नंदुरबार : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क
नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी उद्या सोमवार (दि.१३) रोजी मतदान होत आहे. या मतदानाला काही तासांचा अवधी शिल्लक राहीला आहे. तर नर्मदा काठावरील मतदान केंद्रांवर पोलीस पथक शनिवारी (दि.११) विविध अडचणी पार करत रवाना झाले.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा आदिवासी बहुल डोंगराळ तसेच नर्मदा नदीकाठाने व्यापलेला परिसर आहे. येथील विकास अजूनही खुंटलेला असल्याने विविध ठिकाणी अजूनही चांगले रस्ते नाहीत. त्यामुळे पायपीट करत पायवाटेचा आधार घ्यावा लागतो आहे. अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात तर अनेक भागात टॉवर नसल्याने मोबाईलवरुन संवाद साधणे कठीण होत आहे. अशा भागांमध्येही मतदान केंद्रे असून अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना पोहचताना विविध कसरती पार पाडाव्या लागत आहे. मतदारसंघात पाच मतदान केंद्रांवर पोहचणे अतिशय खडतर प्रवास मानला जातो. या केंद्रांवर पोहचण्यासाठी पथकाला रस्त्याने कित्येक किलोमीटरचा प्रवास आणि नंतर सरदार सरोवराच्या जलाशयातून होडीमधून प्रवास करत जावे लागते. त्यामुळे मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी लागणारे अंतर पाहता येथील पाच मतदान केंद्रांसाठी अधिकारी, कर्मचारी, पोलीस पथकांना मतदान दिवसाच्या दोन दिवस पूर्वीच जावे लागते. त्यामुळे मतदानासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना शनिवारी (दि.११) पाच मतदान केंद्रांसाठी पोलीस पथक रवाना झाले होते.  पथकांना मतदान केंद्रांवर पोहचण्यासाठी दिडशे किलोमीटरचा प्रवास गुजरातमधून करावा लागतोय. त्यानंतर केवडिया कॉलनीत पथके आल्यावर कॉलनीतून होडीचा आधार घेत सोबत मतदानाचे साहित्य बरोबर घेवून सरदार सरोवराच्या जलाशयातून मतदान केंद्रांकडे रवाना व्हावे लागत आहे. तर पाच मतदान केंद्रांपैकी महाराष्ट्र राज्यातील पहिले मतदार केंद्र असलेल्या मणिबेली केंद्राचा समावेश करण्यात येतो. तसेच मुखडी, डनेल, बामणी आणि चिमलखेडी या मतदान केंद्रांवर होडीतूनच प्रवास करावा लागतो.
हेही वाचा:

पीएम मोदींना चर्चेचे निमंत्रण: स्मृती इराणींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली
गोवा : सिलिंडरच्या गॅस गळतीमुळे एकाचा गुदमरून मृत्यू
उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा : बावनकुळे