नांदेड : किनवटच्या भाजी मार्केटमध्ये पतीने पत्नीला पेटविले

किनवट; पुढारी वृत्तसेवा : शहरालगतच्या गोकुंदा परिसरातील दत्तनगरातील युवकाने स्वतःच्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना किनवट पालिकेच्या भाजी मार्केटमध्ये शनिवारी (दि.११) सायंकाळी घडली. दत्तनगर गोकुंदा येथील रहिवाशी असलेली ३५ वर्षीय महिला शनिवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान भाजीपाला खरेदीसाठी किनवट पालिकेच्या भाजी मंडईमध्ये आली होती. भाजीपाला, मसाले व अन्य दुकानांनी गजबजलेल्या मार्केटमधून …

नांदेड : किनवटच्या भाजी मार्केटमध्ये पतीने पत्नीला पेटविले

किनवट; Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरालगतच्या गोकुंदा परिसरातील दत्तनगरातील युवकाने स्वतःच्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना किनवट पालिकेच्या भाजी मार्केटमध्ये शनिवारी (दि.११) सायंकाळी घडली.
दत्तनगर गोकुंदा येथील रहिवाशी असलेली ३५ वर्षीय महिला शनिवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान भाजीपाला खरेदीसाठी किनवट पालिकेच्या भाजी मंडईमध्ये आली होती. भाजीपाला, मसाले व अन्य दुकानांनी गजबजलेल्या मार्केटमधून ती महिला भाजीपाला घेऊन घराकडे परतत असतांना, तिच्या मागावर असलेला तिचा पती अर्जुन सातपुते डब्यातून पेट्रोल घेऊन आला होता. त्याने भर बाजारातच पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.
या घटनेत  महिला चांगलीच भाजली. प्रसंगावधान राखत परिसरातील व्यापाऱ्यांनी पाणी ओतून महिलेला वाचविले. या घटनेनंतर आरोपी अर्जुन फरार झाला. व्यापारी व नागरिकांनी पोलिसांना फोन केल्यानंतर उशिराने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने पोलीस वाहनातून महिलेला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
भाजलेल्या महिलेस ३ अपत्य आहेत. अर्जुन सातपुतेने पत्नीला का पेटविले? याचे कारण अद्यार स्पष्ट झालेले नाही. रात्री उशिरापर्यंत अर्जुन हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. दरम्यान, महिलेची तब्येत खालावल्याने रात्री उशिरा तिला आदिलाबादला हलविण्यात आले. आरोपी अर्जुन सातपुते यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेलंगणातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे सीमेवरील चेकपोस्टना अचानक भेट देऊन पाहणी करण्यासाठी या भागात आले असता, ही घटना कळाल्यानंतर त्यांनी किनवट पो.स्टे.भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली.