केदारनाथचे दरवाजे उघडले; चारधाम यात्रा सुरू

रुद्रप्रयाग; वृत्तसंस्था : हिंदूंच्या पवित्र चारधाम यात्रेला शुक्रवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सकाळी 6.55 वाजता केदारनाथधामचे दरवाजे उघडण्यात आले. हजारो भाविकांसह उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही दर्शन घेतले. केदारनाथपाठोपाठ गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजेही उघडले. बद्रीनाथ मंदिरात मात्र 12 मेपासून दर्शनाला सुरुवात होईल. येथे दिवसाचे तापमान शून्य ते 3 अंशांवर नोंदवले जात असून रात्री उणेपर्यंत …

केदारनाथचे दरवाजे उघडले; चारधाम यात्रा सुरू

रुद्रप्रयाग; वृत्तसंस्था : हिंदूंच्या पवित्र चारधाम यात्रेला शुक्रवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सकाळी 6.55 वाजता केदारनाथधामचे दरवाजे उघडण्यात आले. हजारो भाविकांसह उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही दर्शन घेतले. केदारनाथपाठोपाठ गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजेही उघडले. बद्रीनाथ मंदिरात मात्र 12 मेपासून दर्शनाला सुरुवात होईल.
येथे दिवसाचे तापमान शून्य ते 3 अंशांवर नोंदवले जात असून रात्री उणेपर्यंत खाली घसरत आहे. कडाक्याच्या या थंडीतही सुमारे 10 हजार भाविक केदारनाथ धामलगतच्या गौरीकुंडात पोहोचले आहेत. भाविकांसाठीच्या येथील सर्व 1500 खोल्या बुक झाल्या आहेत. 5,545 खेचर बुक झाले आहेत. 15 हजारांवर लोक हरिद्वार आणि ऋषीकेश येथे दाखल झाले आहेत. चारधाम यात्रेसाठी आतापर्यंत 22.15 लाखांवर भाविकांनी नोंदणी केली आहे. गतवर्षी विक्रमी 55 लाख भाविकांनी दर्शन घेतले होते.
प्रथमच भाविकांची संख्या मर्यादित; केवळ 15 हजार दररोज केदारनाथला भेट देऊ शकतील
गतवर्षी विक्रमी 55 लाख लोक आल्याने व्यवस्था विस्कळीत झाली होती. त्यामुळे यंदा चारधाम यात्रेतील भाविकांची रोजची संख्या मर्यादित केली आहे. यंदा दररोज 51 हजार भाविक चारधामला (विभागून) भेट देतील.

Go to Source