अरविंद केजरीवालांची राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे चौकशी करा : नायब राज्यपाल
प्रथमेश तेलंग
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे चौकशी करा, अशी शिफारस नायब राज्यपालांनी आज (दि.६) केली. शिख फॉर जस्टीस या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेकडून कथित राजकीय निधी घेतल्याप्रकरणी अरविंद केजरीवालांच्या तपासाची शिफारस करण्यात आली. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी ही शिफारस केली.
दिल्लीच्या राज्यपालांकडे अरविंद केजरीवालांविरोधात हिंदू महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस आशु मोंगिया यांनी तक्रार केली होती. तक्रारीत अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाने खालिस्तानी संघटनेकडून १६ दशलक्ष डॉलर म्हणजेच १३३ कोटींची राजकीय मदत घेतल्याचा आरोप होता. देवेंद्र पाल भुल्लरला सोडण्यासाठी ही मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरुनच नायब राज्यपालांनी एनआयए चौकशीची शिफारस केली.
मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी त्यांना अद्याप जामीन मिळाला नाही. त्यामध्येच आता नायब राज्यपालांनी केजरीवालांच्या राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे तपासाची शिफारस केली.
हेही वाचा :
P. Chidambaram : काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांनी डोळ्यावर उपचार करावेत: पी. चिदंबरम
Rajkumar Anand joins BSP: ‘आप’चे राजकुमार आनंद ‘बसपा’त: नवी दिल्लीतून लोकसभा लढवणार
Lok Sabha Election 2024 : कन्हैया कुमार यांचा उत्तर पूर्व दिल्ली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल
Latest Marathi News अरविंद केजरीवालांची राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे चौकशी करा : नायब राज्यपाल Brought to You By : Bharat Live News Media.