एलियन्सचा तो संदेश अन् शास्त्रज्ञही गोंधळले!

एलियन्सचा तो संदेश अन् शास्त्रज्ञही गोंधळले!

वॉशिंग्टन : एलियन्स आहेत की नाहीत, हे आजवर कधीच स्पष्ट होऊ शकलेले नाही, पण आपण एलियन्स पाहिलेले आहेत, असा अनेकांचा दावा रहात आला आहे. एका रात्री एका प्रयोगशाळेत रात्री 11 वाजून 16 मिनिटांनी रेडिओ सिग्नल आले, तो अंतराळातून पृथ्वीवर आलेला मेसेज होतो. तो मेसेज वाचल्यानंतर शास्त्रज्ञही हादरले होते. हा मेसेज एलियन्सनी पाठवला आहे का, हा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला.
15 ऑगस्ट 1977 च्या रात्री अमेरिकेच्या ओहायो खगोलशाळेत सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू होते; मात्र रात्री सव्वाअकराच्या आसपास प्रयोगशाळेला जोडलेल्या बिग इअर टेलिस्कोपने असे रेडिओ सिग्नल पकडण्यास सुरुवात केली, ज्यामुळे खूप मोठा आवाज येऊ लागला. आजूबाजूच्या परिसरातील इतर कोणत्याही आवाजापेक्षा तीस पटीने तो जास्त मोठा आवाज होता. एक विशिष्ट कोड सिग्नल पूर्ण 72 सेकंदांपर्यंत येत राहिला. संगणक त्यांची नोंद करत राहिला. हा सिग्नल 36 सेकंदांपर्यंत मजबूत राहिला आणि नंतर तो कमी होऊ लागला. संपूर्ण प्रयोगशाळेत एकच गोंधळ उडाला. सगळेच घाबरले. हा साधा सिग्नल नव्हता क्रमाने क्रमांक आणि वर्णमाला पाठवला गेला होता.
खगोलशास्त्रज्ञ आणि ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. जेरी आर. एहमानने हा डेटा पाहिला. संगणकाने हा सिग्नल 6 इक्यूयूजे 5 म्हणून छापला. त्याची तीव्रता 36 सेकंदांपर्यंत वाढली, नंतर 36 सेकंदांसाठी कमी झाली कारण पृथ्वी फिरत असताना दुर्बिणी सिग्नलच्या उत्पत्तीपासून दूर गेली. हा सिग्नल पृथ्वीवर आला त्या रात्री काय घडले हे कोणीही सांगू शकत नाही.
कॉर्नेल विद्यापीठातील दोन भौतिकशास्त्रज्ञांनी असा सिद्धांत दिला होता की जर एलियन्स आपल्याशी संपर्क साधू इच्छित असतील तर ते रेडिओ सिग्नल वापरतील, कारण ते खूप सहज पोहोचतात. परग्रहवासी 1420 मेगाहर्ट्झने त्यांचा संदेश पाठवतील, कारण हायड्रोजनचे अणू फ्रिक्वेन्सीवर ऐकू येतील आणि हायड्रोजन हा विश्वातील सर्वात सामान्य घटक आहे; मात्र हा प्रश्नही रास्त आहे की, जर एखाद्या बुद्धिमान व्यक्तीला आमच्याशी संवाद साधायचा होता तर त्याने पुन्हा तसे का केले नाही. कारण त्यानंतर असे सिग्नल फारसे आले नाहीत.
हा मेसेज कुठून आणि कसा आला हे 45 वर्षांनंतरही शास्त्रज्ञही शोधू शकले नाही. हे एक गूढच आहे. हे अजूनही शास्त्रज्ञांसाठी एक न सुटलेले कोडे आहे, पण आपण विश्वात एकटे नाही, कदाचित आपल्यापेक्षा अधिक बुद्धिमान सभ्यता देखील कुठेतरी अस्तित्वात आहे, हेच यावरून दिसते, असे संशोधक मानतात.