हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार, डॉ. भारती पवारांना दिलासा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क भाजप पदाधिकारी यांनी घेतलेल्या मध्यस्थीला यश आले असून दिंडोरीमधून इच्छुक असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभा निवडणूकीतून अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. चव्हाण यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज झाल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात …

हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार, डॉ. भारती पवारांना दिलासा

नाशिक : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क
भाजप पदाधिकारी यांनी घेतलेल्या मध्यस्थीला यश आले असून दिंडोरीमधून इच्छुक असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभा निवडणूकीतून अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. चव्हाण यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज झाल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडणूक लढविणार की, माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. एकूणच मतदारसंघातील आपल्या मित्र परिवार व भाजपतील त्यांच्या समर्थकांशी चर्चा करून चव्हाण यांनी उमेदवारी करू नये, यासाठी भाजपकडून चव्हाणांची मनधरणी करण्यात यश आले आहे.