फडणवीसांच्या उपस्थितीत देवेंद्र कोठे यांचा भाजपमध्ये प्रवेश

फडणवीसांच्या उपस्थितीत देवेंद्र कोठे यांचा भाजपमध्ये प्रवेश

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : सोलापूरचे भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वात देवेंद्र कोठे यांनी आज (दि.२४) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश घेतला. देवेंद्र कोठे हे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निवडणूक कॅम्पेन सांभाळणारे तात्या कोठे यांचे नातू असल्याने याचा  शिंदे यांना धक्का बसला आहे.
यावेळी बोलताना नरेंद्र काळे म्हणाले, तात्या कोठे यांचे नातू असणारे देवेंद्र कोठे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, याला विशेष महत्व आहे. कोठे कुटुंबातील व्यक्ती आमच्यासोबत आल्याने निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नक्कीच भाजपला याचा फायदा होणार आहे.
दरम्यान, देवेंद्र कोठे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर विश्वास ठेवत मी भाजपात प्रवेश घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेण्यासाठी बोलावले होते. शहराच्या राजकीय परिस्थितीवर आज चर्चा झाली. पालकत्व स्वीकारत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मला सांगितले आहे. यावेळी नक्कीच सोलापूर लोकसभा मतदारसंघात लागणारा निकाल हा भाजपच्या बाजूने असेल, असा विश्वासही कोठे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :

रावसाहेब दानवेंचा शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल; भव्य रॅलीसह सभा
पश्चिम विदर्भातील ५ मतदारसंघातील प्रचार तोफा थंडावल्या; शुक्रवारी मतदान     
नितीन गडकरी यांना सभेत बोलताना भोवळ, कार्यकर्त्यांनी सावरले