रायगड: पेण-वाशी रस्त्यावर कारची रिक्षाला धडक: महिला ठार, रिक्षा चालक जखमी
पेण; Bharat Live News Media वृत्तसेवा : पेण तालुक्यातील पेण – वाशी रस्त्यावर आज ( दि. 22 ) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रिक्षा आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक महिला गंभीररित्या जखमी झाल्याने मृत्यू पावली. तर रिक्षा चालक जखमी झाला. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मौजे वाशी गावच्या हद्दीत वाशी नाका ते वाशी असा प्रवास करणाऱ्या भरधाव कारने (एम एच 06 बी डब्ल्यू 2086) समोरून येणाऱ्या रिक्षाला (एम एच 06 झेड 2608) जोराची धडक दिली.
या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
हेही वाचा
रायगडमध्ये कॉंग्रेसला धक्का: माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
रायगड : कशेडी घाटात ट्रेलरची कारला धडक; दोघे जखमी
रायगड : रेल्वे प्रवाशांसाठी विशेष सेवा; पनवेल-नांदेड दरम्यान धावणार ४० गाड्या