काळजी घ्या ! पुण्याचा पारा वाढताच; कोरेगाव पार्कचे तापमान 42 अंशांवर

काळजी घ्या ! पुण्याचा पारा वाढताच; कोरेगाव पार्कचे तापमान 42 अंशांवर

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पुणे शहर आणि उपनगरातील कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. बुधवारी कोरेगाव पार्क भागाचा तापमानाचा पारा 42 अंश एवढा नोंदला गेला असून, किमान तापमानही 24 अंशांवर पोहचले आहे. शहरासह उपनगरांत तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढेच पुढील 9 एप्रिलपर्यंत राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, 9 मार्चच्या आसपास शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.पुणे शहरात मागील आठवड्यापासून उन्हाचा तडाखा अगदी सकाळपासूनच जाणवत आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेपर्यंत उन्हाच्या तडाख्यामुळे पुणेकर चांगलेच
हैराण होत आहेत.
या उन्हाच्या तडाख्यामुळे अंगात थंडावा राहावा, यासाठी नागरिकांचा ओढा थंडपेय घेण्याकडे वाढला आहे. त्यामुळे ताक, आईस्क्रीम, कोकम, लिंबू सरबत आदींना चांगलीच मागणी वाढली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शहरासह उपनगरांत रस्त्यावरील वाहतूक मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, कमाल तापमान 40 अंशांच्या पुढे, तर किमान तापमानाचा पारा 18 ते 25 अंशांच्या आसपास पोहचले आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवडाभर शहरात तीव्र उन्हाचा तडाखा आणि रात्रीचा उकाडा राहणार आहे.
हेही वाचा

Pune News : पुण्यात बांधकामांना सुगीचे दिवस
जे. एम. रोडला पादचारी पुलांचा साज; पादचार्‍यांना रस्ता ओलांडणे सोपे
कोल्हापूर : वर्षभरात जिल्ह्यात २६ गावांमध्ये साथ

Latest Marathi News काळजी घ्या ! पुण्याचा पारा वाढताच; कोरेगाव पार्कचे तापमान 42 अंशांवर Brought to You By : Bharat Live News Media.