कोल्हापूर : वर्षभरात जिल्ह्यात २६ गावांमध्ये साथ
विकास कांबळे
कोल्हापूर : पाणी प्रदूषण व अस्वच्छता यामुळे जिल्ह्यात अधूनमधून साथी पसरत असतात. साथ पसरण्यापूर्वी आरोग्य विभागाच्या वतीने फारसे लक्ष दिले जात नाही, मात्र साथ पसरल्यानंतर आरोग्य विभागाची धावपळ सुरू होते. प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात होण्यासाठी साथीने गंभीर रूप धारण केलेले असते. यात काही गावांमध्ये नागरिकांचा बळीदेखील गेला आहे. काही ठराविक गावामध्ये ठराविक कालावधीत दरवर्षी साथ येत असते परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी तीन-तीन महिने साथ एकाच गावात राहते.
ग्रामपंचायतींच्या वतीने पाणी शुद्धतेकडे पुरेसे लक्ष देण्यात येत नसल्यामुळे जिल्ह्यात काविळीची साथ निर्माण होणार्या गावांची संख्या वाढत आहे. अनेक गावांत साफसफाईंकडे दुर्लक्ष केले जाते. सांडपाण्याची निर्गत व्यवस्थित केली जात नाही. अशा गावांमध्ये अधूनमधून डेंग्यू, चिकुन गुनियाची साथ येत असते. ही साथ कधी कधी एवढी फैलावते की आरोग्य विभागाला काही वेळा तिला आवरणे शक्य होत नाही. कोडोली (ता. पन्हाळा) येथे चिकुन गुनियाची ऑक्टोबर 2023 रोजी सुरू झालेली साथ नवीन वर्ष येईपर्यंत सुरूच होती.
वर्षभरात दर महन्याला कोणत्यातरी गावात साथीचे रुण आढळून आल्याचे अहवालावरून दिसून येते. एकदा आलेली साथ आटोक्यात आणण्यासाठी साधारणपणे कमीत कमी एक महिन्याचा कालावधी लागतो. कोडोली येथील साथ मात्र त्याला अपवाद ठरली. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाला तीन महिने परिश्रम घ्यावे लागले. जिल्ह्यात आढळून आलेल्या साथ रोगामध्ये डेंग्यू, कावीळ, चिकुन गुनियासह हिवताप, झिका, अतिसार, कॉलरा, स्वाईन फ्लू यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
गावनिहाय साथीची माहिती
साथीचे नाव गाव कालावधी
चिकुन गुनिया आलास 1 महिना 29 दिवस
डेंग्यू कसबा तारळे 1 महिना 14 तास
डेंग्यू सैनिक टाकळी 1 महिना 8 दिवस
चिकुन गुनिया तेरवाड 1 महिना 15 दिवस
डेंग्यू वाघवे 2 महिने 4 दिवस
डेंग्यू सरवडे 1 महिना 14 दिवस
डेंग्यू सांगरुळ 1 महिना 16 दिवस
डेंग्यू आळते 1 महिना 23 दिवस
डेंग्यू कोडोली 1 महिना 8 दिवस
झिका शहर 1 महिना 24 दिवस
कावीळ निढोरी 3 महिने अजूनही सुरूच
Latest Marathi News कोल्हापूर : वर्षभरात जिल्ह्यात २६ गावांमध्ये साथ Brought to You By : Bharat Live News Media.