परभणी : पिंपरी देशमुख येथे दिवसाढवळ्या घरफोडी रोख रक्कमेसह दागीने लंपास

पूर्णा; पुढारी वृत्तसेवा : ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी देशमुख येथे सोमवारी (दि. १) दुपारी तीन शेतक-यांची अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी करुन रोख रक्कमेसह दागीने लंपास केल्याची घटना घडली. ही माहीती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, ताडकळस पोलिस ठाण्याचे सपोनी कपिल शेळके, पोउनि शिवकांत नागरगोजे,पोउनि काठेवाडे तात्काळ दाखल झाले. चोरी झालेल्या स्थळाची पाहणी … The post परभणी : पिंपरी देशमुख येथे दिवसाढवळ्या घरफोडी रोख रक्कमेसह दागीने लंपास appeared first on पुढारी.

परभणी : पिंपरी देशमुख येथे दिवसाढवळ्या घरफोडी रोख रक्कमेसह दागीने लंपास

पूर्णा; Bharat Live News Media वृत्तसेवा : ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी देशमुख येथे सोमवारी (दि. १) दुपारी तीन शेतक-यांची अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी करुन रोख रक्कमेसह दागीने लंपास केल्याची घटना घडली. ही माहीती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, ताडकळस पोलिस ठाण्याचे सपोनी कपिल शेळके, पोउनि शिवकांत नागरगोजे,पोउनि काठेवाडे तात्काळ दाखल झाले. चोरी झालेल्या स्थळाची पाहणी करुन पंचनामा केला.
या विषयी सविस्तर माहिती अशी की, ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी देशमुख  जि. परभणी येथील फिर्यादी शेतकरी अंकूश भागाराम माने हे सोमवारी (दि. १ एप्रिल) सकाळी १० वाजता घराला कुलूप लावून गंगाखेड तालुक्यातील मुळ गावी लग्नासाठी गेले होते. त्यांच्या घरी कोण नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी चेरू केली.  फळे विक्री करुन आणलेले रोख ५१ हजार रुपये व दुसऱ्या डब्यातील सोन्याचे दागीने लंपास केले.  त्याच बरोबर याच दिवशी येथील आणखी एक शेतकरी प्रभू यंकाजी डुकरे व संतोष हरिभाऊ डुकरे हे ही आपल्या कुटूंबासह बाहेगावी लग्नाला घर बंद करुन गेले होते. यांच्याही घरात शिरुन चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याचे दागीने लंपास केले. असा एकूण २ लाख ९ हजार रुपयाची चोरी केल्याची नोंद‌ ताडकळस पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. असे असले तरी तक्रारीत प्रत्यक्षात चोरी गेलेल्या नगदी रुपये आणि दागिन्याची किंमत अधिक असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घरफोडीमुळे गावक-यातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सदर घटनेप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी कपिल शेळके, पोउनि शिवकांत नागरगोजे,पोउनि काठेवाडे हे करत आहेत.
Latest Marathi News परभणी : पिंपरी देशमुख येथे दिवसाढवळ्या घरफोडी रोख रक्कमेसह दागीने लंपास Brought to You By : Bharat Live News Media.