मुंबईच्या साकीनाकामध्ये दोन गटात तुफान हाणामारी; दोन जण जखमी

मुंबईच्या साकीनाकामध्ये दोन गटात तुफान हाणामारी; दोन जण जखमी

साकीनाका; Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईच्या साकीनाका विभागात मनसेच्या कामगार युनियन मधील धुसपुस रस्त्यावर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्या सह त्यांच्या साथीदारांनी त्यांच्याच युनियनच्या प्रकाश रिंगे आणि अनुप राणा या दोघांना बेदम मारहाण करीत , धारधार शस्त्रांनी वार केल्याची घटना सोमवारी (दि १) रात्री घडली. दोन्ही जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाडा येथील एका कंपनी मधील कामगारांच्या विषयांवरून मनसे कामगार सेनेचे चिटणीस विजय निकम आणि गजानन राणे यांच्यात वाद झाले होते. यामुळे साकीनाका येथील हंसा इंडस्ट्री येथे सोमवारी रात्री विजय निकम,
प्रकाश रिंगे आणि अनुप राणा व इतर पदाधिकारी आले होते. विजय निकम तिथून निघून गेले आणि गजानन राणे तिथे पोहचले.त्यांच्यासोबत वीस ते पंचवीस कार्यकर्ते देखील होते.त्यांच्या हातात तलवारी देखील होत्या.त्यानी थेट प्रकाश आणि अनुप यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.या वेळी तिथे उपस्थित मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी याचा व्हिडीओ मोबाईल वर रेकॉर्ड केला.जखमी अवस्थेतील दोघांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.तर या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे .मात्र गजानन राणे आणि त्याचे साथीदार फरार असून साकीनाका पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Latest Marathi News मुंबईच्या साकीनाकामध्ये दोन गटात तुफान हाणामारी; दोन जण जखमी Brought to You By : Bharat Live News Media.