गोंदिया : शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; लाखोंचा माल जळून खाक

गोंदिया : शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; लाखोंचा माल जळून खाक

गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथे विद्युत शॉर्ट सर्किटमुळे घराला अचानक आग लागून घरातील सर्व साहित्य व विद्युत उपकरणे जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (ता़ २) सायंकाळच्या सुमारास घडली़ शेजाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही़ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार पिंडकेपार येथील रहिवासी रमेश पटले यांचे मालकीचे मातीचे घर असून मंगळवारी सायंकाळी घराला विद्युत शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. दरम्यान, शेजाºयांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र, आग आटोक्यात आली नाही़. आगीने रौद्ररुप घेत घरातील साहित्यांसह जनावरांचा चारा, लाकडी चिरान व इतर साहित्य जळून खाक झाले. माहिती मिळताच गोरेगाव नगर पंचायतीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला़ मात्र तोपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले होते. या घटनेत घरमालक रमेश पटले यांचे अंदाजे सात लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमीक अंदाज आहे. घटनेची माहिती गोरेगाव पोलीस आणि महसूल विभागाला देण्यात आली आहे.
Latest Marathi News गोंदिया : शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; लाखोंचा माल जळून खाक Brought to You By : Bharat Live News Media.