शहीद जवान चौधरींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान चौधरींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

आळंदी : Bharat Live News Media वृत्तसेवा : लडाख येथे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये हवालदार हुद्द्यावर देशसेवेत कार्यरत असताना शहीद झालेले जवान हवालदार दिलीप मारुती चौधरी (वय 47) यांच्यावर केळगाव (ता. खेड) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लडाख येथे देशसेवेत कार्यरत असताना शनिवारी (दि. 30 मार्च) त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. केळगाव येथील स्मशानभूमीमध्ये सोमवारी (दि. 1 एप्रिल) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे, पोलिस उपनिरीक्षक तुकाराम खडके, पोलिस हवालदार पृथ्वीराज पाटील, पोलिस नाईक जालिंदर जाधव, मंडलाधिकारी राजेंद्र वाघ, ग्रामपंचायत व महसूल विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मूळचे वाफगाव (ता. खेड) येथील असलेले शहीद हवालदार चौधरी हे 2002 पासून देशसेवेत होते. त्यांनी 18 वर्षे अरुणाचल प्रदेश येथे देशसेवा केली. 75 दिवसांपूर्वीच ते लडाख येथे सेवा देण्यासाठी रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात यांच्या आई, पत्नी चित्रा चौधरी व दोन मुली गौरी व नम्रता आहेत. केळगाव येथे त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
हेही वाचा

मंत्री चंद्रकांत पाटील जेव्हा ‘डॉक्टर’ होतात..
Delhi Excise Policy Case | आप खासदार संजय सिंह यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर
चोवीस तासांपेक्षा जास्त शिळा भात का खाऊ नये?

 
Latest Marathi News शहीद जवान चौधरींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार Brought to You By : Bharat Live News Media.