उत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले

उत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : उत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात मध्यवर्ती-श्रेणीचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (IRBM) आज (दि.२) डागले. या वृत्ताला जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. क्योडो न्यूजने जपान संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत म्हटले आहे की, उत्तर कोरियाच्या पश्चिम किनारपट्टीवरून आज सकाळी 6. 52 वाजता एक क्षेपणास्त्र डागण्यात आले. यात विमान किंवा जहाजांचे नुकसान झाल्याचे कोणतेही वृत्त समोर आलेले नाही. North Korea ballistic missile
उत्तर कोरियाने समुद्राच्या पूर्व किनाऱ्याच्या दिशेने मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. दक्षिण कोरियाच्या लष्कराने ही माहिती दिली. यानंतर परिसरात तणाव वाढला आहे. North Korea ballistic missile

दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने सांगितले की, हे क्षेपणास्त्र उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगजवळील भागातून सोडण्यात आले होते, परंतु क्षेपणास्त्र किती अंतरापर्यंत गेले, हे त्यांनी सांगितले नाही. उत्तर कोरियाने गेल्या महिन्यात त्याच्या नवीन, मध्यम-श्रेणीच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रासाठी घन-इंधन इंजिनची चाचणी केली होती.

दरम्यान, उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलला लक्ष्य करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या रॉकेटची पाहणी केली.

जपानी कोस्ट गार्डने सांगितले की, क्षेपणास्त्र आधीच पाण्यात उतरले आहे. परंतु, त्या भागातून जाणाऱ्या जहाजांना सावधगिरी बाळगण्याच्या सुचना दिल्या आहेत.

North Korea fires intermediate-range ballistic missile towards Sea of Japan
Read @ANI Story | https://t.co/7O10mIxnab#NorthKorea #SouthKorea pic.twitter.com/KPJPrrJLc5
— ANI Digital (@ani_digital) April 2, 2024

हेही वाचा 

Unemployment Rate in India : भारतात शिकलेल्यांपेक्षा निरक्षरांनाच रोजगाराच्या अधिक संधी
Stock Market | २०२४ ची निवडणूक आणि शेअर बाजाराची दिशा, गुंतवणूक कशी करावी?
Japan Earthquake : जपानमध्ये पुन्हा शक्तिशाली भूकंपाचे हादरे

Latest Marathi News उत्तर कोरियाने जपानच्या समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले Brought to You By : Bharat Live News Media.