आराध्य गुरुदेव कानमुनीजी म. सा. यांची आज गुणानुवाद सभा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा संयम सुमेरू, तपस्वीराज, पंडीतरत्न सर्वाधिक दीक्षा पर्यायी, परम आराध्य,गुरुदेव कानमुनीजी म.सा. यांचा सोमवार (दि.१) रोजी ९१ वर्षे पूर्ण होऊन ९२ व्या वर्षात पदार्पण झाले आणि याच दिवशी दुपारी सव्वा बारा वाजता संथारा व्रतात  देवलोक गमन होणे हा दैवी योगायोग घडून आला. त्यांचे दीक्षा वर्षाचे हे ७९ वे वर्ष होते. त्यांच्या पार्थिवावर … The post आराध्य गुरुदेव कानमुनीजी म. सा. यांची आज गुणानुवाद सभा appeared first on पुढारी.

आराध्य गुरुदेव कानमुनीजी म. सा. यांची आज गुणानुवाद सभा

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
संयम सुमेरू, तपस्वीराज, पंडीतरत्न सर्वाधिक दीक्षा पर्यायी, परम आराध्य,गुरुदेव कानमुनीजी म.सा. यांचा सोमवार (दि.१) रोजी ९१ वर्षे पूर्ण होऊन ९२ व्या वर्षात पदार्पण झाले आणि याच दिवशी दुपारी सव्वा बारा वाजता संथारा व्रतात  देवलोक गमन होणे हा दैवी योगायोग घडून आला. त्यांचे दीक्षा वर्षाचे हे ७९ वे वर्ष होते. त्यांच्या पार्थिवावर जैन संथारा विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. श्री वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ व श्री सकल संघाचे संघपती आदरणीय दलीचंदजी जैन, श्री संघाचे आधारस्तंभ मा. इश्वरबाबुजी ललवाणी, धर्मदास गण परिषद चे श्री सुमितजी चोपडा, इंदौर यांनी विनयांजली अर्पण केली. यावेळी जळगाव येथील पाच व्यक्ती मिळून धार्मिक व पारमार्थिक, वैय्यावच् सेवा कार्यासाठी ११ लाख रुपयांची पुण्यस्मृती निमित्त पुण्यराशी घोषित करण्यात आली आहे.
अकरा वर्षांपासून जळगावला स्थिरवास
मध्यप्रदेशातील धार जिल्हयातील राजगढ येथे दि. १ एप्रिल १९३३ मध्ये जन्मलेले कानमुनी यांना त्यांच्या घरापासूनच धार्मिक संस्कार मिळाले होते. दि. १८ जानेवारी १९४५ ला मध्यप्रदेशातील खाचरौद येथे त्यांचे पिता, एक भाऊ, व एक बहीण याप्रमाणे कुटुंबातील चार जणांनी दीक्षा घेतली. धर्मदास संप्रदायचे वरीष्ठ संत म्हणून त्यांची ख्याती होती. २०१३ ला चातुर्मास धार्मिक कार्यासाठी त्यांचे जळगाव येथे आगमन झाले होते. त्यांना मानणारा सर्वात मोठा भाविक वर्ग आहे. त्यांच्या दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येकाला धर्मध्यान करावे असा आग्रह करीत असत. ते शिर्षासन करून प्रतिक्रमण करीत असत. प्रकृती अस्वास्थामुळे गेल्या सात वर्षांपासून ते आकाशवाणी चौकातील श्री सतिष ललवाणी यांच्या बंगल्यात स्थिर झाले होते.

आकाशवाणी चौक, स्वातंत्र्यचौक, पांडेचौक मार्गे नेरी नाका स्मशानभूमित त्यांचा पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी दलूभाऊ जैन, ईश्वरबाबूजी ललवाणी, कस्तूरचंद बाफना, अशोक जैन, प्रदीप रायसोनी, सुशिल बाफना, मनिषदादा जैन, स्वरूप लुंकड, सतीश ललवाणी, ललीत लोडाया, राजेश जैन, जितेंद्र चोरडीया, अमर जैन, अजय राखेचा,पारस राका,आशिष भंडारी, तेजस कावडीचा, यांच्यासह समाज बांधव व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळगाव जिल्हा, धुळे, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, खंडवा या जिल्हयातील भाविक ही त्यांच्या अंतिम यात्रेत सहभागी होते.
आज गुणानुवाद सभा
जळगाव येथील आर सी बाफना स्वाध्याय भवन येथे परम आराध्य गुरुदेव कानमुनीजी म.सा. यांची मंगळवार (दि.२) रोजी रोजी  गुणानुवाद सभा आयोजली आहे. यासाठी श्रावक श्राविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सकल संघाचे अध्यक्ष दलिचंद जैन यांनी केले आहे.

Latest Marathi News आराध्य गुरुदेव कानमुनीजी म. सा. यांची आज गुणानुवाद सभा Brought to You By : Bharat Live News Media.