MI vs RR : राजस्थान जोमात! तिसऱ्या षटकात मुंबईच्या चार विकेट; ईशान किशन तंबूत परतला
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२४ चा १४ सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईतील वानखेडे आज स्टेडियमवर होत आहे. सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
तिसऱ्या षटकात मुंबईच्या चार विकेट; ईशान किशन तंबूत परतला
मुंबईला राजस्थानने ईशान किशनच्या रूपाने चौथा धक्का दिला आहे. नांद्रे बर्जरने 29 धावांवर इशान किशनला बाद केले. या सामन्यात त्याला 16 धावा करता आल्या. हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.
तिसऱ्या षटकात मुंबईला तिसरा धक्का; डेवाल्ड ब्रेविस आऊट
मुंबईला राजस्थानने डेवाल्ड ब्रेविसच्या रूपाने तिसरा धक्का दिल्ला आहे. नांद्रे बर्गरने त्याला क्रीनबोल्ड केले.
पहिल्याच षटकात बोल्टकडून मुंबईला दोन धक्के; रोहितसह नमन शुन्यावर आऊट
मुंबईची सुरूवात खराब झाली आहे. रोहित शर्माबरोबर नमन धीर आल्याबरोबर पॅव्हेलियनमध्ये परतला. दोघेही शुन्यावर बाद झाले. रोहितला बोल्टने सॅमसनच्या हस्ते झेलबाद केले. तसेच नमन धीर एलबीडब्लू आऊट झाला.
मुंबई इंडियन्स प्लेईंग 11
रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेविड, गेराल्ड कोइत्जे, पियुष चावला, आकाश मढवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका
राजस्थानची प्लेईंग 11
यशस्वी जायस्वाल, जोश बटलर, संजू सॅमसन, रियान पराग, शिमरोन हिटमायर, ध्रुव जुरेल, आर. अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युजवेंद्र चहल
Latest Marathi News MI vs RR : राजस्थान जोमात! तिसऱ्या षटकात मुंबईच्या चार विकेट; ईशान किशन तंबूत परतला Brought to You By : Bharat Live News Media.