परभणी: महादेव जानकरांचा शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल
परभणी: Bharat Live News Media वृत्तसेवा : महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांनी आज (दि.१) सकाळी ११ च्या सुमारास महायुतीच्या पदाधिकार्यांसमवेत आपले तीन अर्ज दाखल केले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत आदींची उपस्थिती होती. Mahadev Jankar
यावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी आमदार मोहन फड, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, माजी खा. सुरेश जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण देशमुख, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकूटे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, माजी महापौर, प्रताप देशमुख, भाजपचे विधानसभा प्रमुख आनंद भरोसे, विजय वरपुडकर, माजी आ. रामराव वडकुते आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. Mahadev Jankar
हेही वाचा
Lok Sabha Election 2024 :अखेर महादेव जानकर ‘महायुती’त सहभागी
तुम्ही दोघेही सत्तेत; मात्र मी कोठे ? महादेव जानकर यांचा सवाल
Mahadev Jankar : महादेव जानकर ‘बारामती लोकसभा’ लढविणार
Latest Marathi News परभणी: महादेव जानकरांचा शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल Brought to You By : Bharat Live News Media.