डॉ. भास्कर मोरे याचा जामीन फेटाळला; कोठडीतील मुक्काम वाढला

जामखेड : पुढारी वृतसेवा : रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याचा जामीन अर्ज श्रीगोंदा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. शेख यांनी फेटाळला आहे. त्यामुळे मोरेचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. आरोपी मोरे हा स्रीलंपट प्रवृत्तीचा व समाजविघातक कृती करणारा असून, त्याने केलेला विनयभंगाचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. तसेच, त्याच्याविरुद्ध 4 अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद … The post डॉ. भास्कर मोरे याचा जामीन फेटाळला; कोठडीतील मुक्काम वाढला appeared first on पुढारी.

डॉ. भास्कर मोरे याचा जामीन फेटाळला; कोठडीतील मुक्काम वाढला

जामखेड : Bharat Live News Media वृतसेवा : रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याचा जामीन अर्ज श्रीगोंदा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. शेख यांनी फेटाळला आहे. त्यामुळे मोरेचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. आरोपी मोरे हा स्रीलंपट प्रवृत्तीचा व समाजविघातक कृती करणारा असून, त्याने केलेला विनयभंगाचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. तसेच, त्याच्याविरुद्ध 4 अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. तेव्हा आरोपीस जामीन मंजूर झाल्यास, तो अशाच प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, न्यायालयाने आरोपीस पूर्वीच्या गुन्ह्यात दिलेल्या जामिनाच्या अटी व शर्तीचे वारंवार उल्लघंन करीत आहे. आरोपीला कायद्याचा धाक असल्याचे दिसून येत नाही.
आरोपीविरुद्ध एकूण 23 मुलींनी तक्रार अर्ज केले होते परंतु, त्यास अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यामुळे, त्या मुली तक्रार करण्यास पुढे आल्या नाहीत. मोरेविरुद्ध आतापर्यंत सहा वेगवेगळ्या दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्यामुळे डॉ. मोरेचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. कापसे, अ‍ॅड. अनिकेत भोसले, अ‍ॅड. अमोल जगताप, अ‍ॅड. सुमित बोरा, अ‍ॅड. अभिषेक तोरडमल यांनी केला. त्यानंतर सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. लैंगिक, आर्थिक व शैक्षणिक पिळवणुकीविरूद्ध विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पदाधिकारी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्याबाबत न्यायालयाने समाधान व्यक्त केले.
फिर्यादी, साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता
भास्कर मोरेला जामीन दिल्यास तो फिर्यादी व इतर साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता आहे. आरोपी हा संस्थेचा अध्यक्ष असल्याने तो प्रॅक्टिकल विषयात नापास करेल, या भितीने मुली तक्रार करण्यास समोर येत नाहीत. आरोपीने अनेक मुलींचा लैंगिक छळ केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने त्याचा जामीन फेटाळला आहे.
जामखेड पोलिसांवर न्यायालयाचे ताशेरे
जामखेड पोलिसांकडून भास्कर मोरेचे पूर्वीचे प्रकरण व याप्रकरणात होत असलेल्या संशयास्पद कामगिरीबद्दल श्रीगोंदा न्यायालयाने जामखेड पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.
हेही वाचा

नाशिकमध्ये नेपाळी तरुणाची गळा चिरुन हत्या, शहर हादरलं
स्वातंत्र्यानंतर सिद्धटेकला प्रथमच पोस्ट! नागरिकांत आनंदाचे वातावरण
सांगलीच्या आखाड्यात ‘पाटील’की कोणाची?

Latest Marathi News डॉ. भास्कर मोरे याचा जामीन फेटाळला; कोठडीतील मुक्काम वाढला Brought to You By : Bharat Live News Media.