दुर्दैवी ! मोटारसायकल गतिरोधकावर आदळून महिलेचा मृत्यू
वाळकी : Bharat Live News Media वृत्तसेवा : नातेवाईकांना मुलीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी पतीसह चाललेल्या महिलेचा मोटारसायकल गतिरोधकावर आदळून झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नगर तालुक्यातील वाळकी येथे शनिवारी (दि.30) दुपारी घडली.
सुवर्णा भाऊसाहेब भोर (वय 40, रा. चास, ता.नगर) असे मयत महिलेचे नाव आहे. मयत भोर यांच्या मुलीचे येत्या 5 एप्रिलला लग्न आहे. त्याचे निमंत्रण नातेवाईकांना देण्यासाठी, तसेच एका नातेवाईकाच्या घरी वाळकी येथे शनिवारी (दि.30) दुपारी लग्न असल्याने, त्या पती भाऊसाहेब भोर यांच्या समवेत मोटारसायकलवर चास येथून वाळकीला गेल्या होत्या.
वाळकी गावाजवळ शाळेच्या समोर गतिरोधकावर त्यांची मोटारसायकल आदळल्याने सुवर्णा या उडून रस्त्यावर पडल्या. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना पती व इतर नातेवाईकांनी तातडीने नगरला एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. याबाबत डॉक्टरांच्या खबरीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सुवर्णा यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासू, दीर असा परिवार आहे.
हेही वाचा
स्वातंत्र्यानंतर सिद्धटेकला प्रथमच पोस्ट! नागरिकांत आनंदाचे वातावरण
नाशिकमध्ये नेपाळी तरुणाची गळा चिरुन हत्या, शहर हादरलं
Lok Sabha Election 2024 : चार मतदारसंघांवर मोहिते पाटलांचा प्रभाव
Latest Marathi News दुर्दैवी ! मोटारसायकल गतिरोधकावर आदळून महिलेचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.