इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा : बीए/बीएस्सी बीएड, लॉ सीईटी नोंदणीला मुदतवाढ
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलकडून बी.ए. / बी.एस्सी. बी.एड., लॉ सीईटीच्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अभ्यासक्रमाच्या सीईटीचे अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी प्राप्त झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी घेण्यात येणार्या बी.ए. / बी.एस्सी.- बी.एड. अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेकरिता तिसर्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्यास 30 मार्चपर्यंत मुदत दिली होती. आता इच्छुक उमेदवार या अभ्यासक्रमासाठी 15 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.
उमेदवार व पालकांकडून बी.ए./ बी.एस्सी.- बी.एड. अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार लक्षात घेऊन महा- बी.ए./ बी.एस्सी. – बी.एड. (4 वर्षे एकात्मिक) सीईटी 2024 साठी अर्ज नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. बी.ए. / बी.एस्सी. – बी.एड. साठी परीक्षेच्या नोंदणीची अंतिम मुदत 30 मार्च देण्यात आली होती. आता ही मुदत 15 एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे, तर परीक्षा येत्या 18 मे रोजी घेण्यात येणार आहे. विधी पाच वर्षांच्या सीईटीसाठी नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार या अभ्यासक्रमासाठी 15 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 30 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. उमेदवार व पालकांकडून विधी पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मुदतवाढ देण्यात आली आहे. परीक्षा नोंदणीची अंतिम मुदत 30 मार्च देण्यात आली होती, आता ती 15 दिवसांनी वाढवून 15 एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. तर दोन दिवसांपूर्वीच्या सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा 18 मे रोजी घेण्यात येणार आहे.
हेही वाचा
Lok Sabha Election 2024 : बेईमान बड्यांनी लुटलेला पैसा गरिबांना परत करणार
खिशाला वीजेचा भार; राज्यात आजपासून होणार नवे वीज दर लागू
Lok Sabha Election 2024 : लोकशाहीच्या रथावर घराणेशाहीच आरूढ! राज्याच्या राजकारणावर तीस घराण्यांचा प्रभाव
Latest Marathi News इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा : बीए/बीएस्सी बीएड, लॉ सीईटी नोंदणीला मुदतवाढ Brought to You By : Bharat Live News Media.