CUET UG 2024 : ‘सीयूईटी यूजी’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली; ५ एप्रिल पर्यंत भरता येणार फॉर्म

CUET UG 2024 : ‘सीयूईटी यूजी’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली; ५ एप्रिल पर्यंत भरता येणार फॉर्म


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) परिक्षार्थींच्या विनंतीनंतर (CUET UG 2024) अंडरग्रेज्युएट अभ्यासक्रमांसाठी सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. नवीन वेळापत्रकानुसार, परिक्षार्थीं आता CUET UG 2024 प्रवेश परीक्षेसाठी Exams.nta.ac.in/CUET-UG/ या अधिकृत वेबसाइटला 4 एप्रिल, सायंकाळी 9:50 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
CUET UG अर्जाची मुदत वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. या अर्जाची मुदत 26 मार्च रोजी संपणार होती, मात्र त्यामध्ये बदल करत 26 मार्च ते 31 मार्चपर्यंत वाढविण्यात आली. आज पुन्हा ही तारीख वाढवून 5 एप्रिल करण्यात आली आहे.
17 मार्च रोजी, यूजीसी प्रमुखांनी माहिती दिली होती की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही असे सांगण्यात आले होते. मात्र तरीही अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतील अंतिम मुदतीमध्ये वारंवार बदल होत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा

CUET-UG – 2024: कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
‘या’ विद्यार्थ्यांची CUET UG 2022 परीक्षा पुन्‍हा लांबणीवर, जाणून घ्‍या कारण

 
The post CUET UG 2024 : ‘सीयूईटी यूजी’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली; ५ एप्रिल पर्यंत भरता येणार फॉर्म appeared first on Bharat Live News Media.

Go to Source