अनन्या पांडे शाहरूख खानची लकी चार्म
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान ( ShahRukh Khan ) हा गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ बॉलीवूडवर अधिराज्य गाजवत आहे. शाहरूखने बॉलीवूडसह आयपीएल क्रिकेटमधूनही बक्कळ पैसा कमावला आहे. कोणताही माणूस एखाद्याला लकी चार्म मानत असतो. त्याला शाहरूखही अपवाद नाही.
संबंधित बातम्या
Crew Box Office Collection : तब्बू, करिना कपूर, क्रितीच्या ‘क्रू’ दोन दिवसांत १८ कोटींच्या घरात
Sunny Deol : अभिनेता सनी देओलचे तिकीट भाजपने कापले
Alia Bhatt : आलिया भट्टने लंडनमध्ये गायिले ‘इक कुडी’
पहिल्यांदा कोलकाता नाईट रायडर्सने पहिली आयपीएल स्पर्धा जिंकली होती, त्यावेळी त्यांनी काही खास व्यक्तींना लकी चार्म मानले होते. त्यातील खास व्यक्ती लेक सुहाना खान आणि तिच्या मैत्रिणी होत्या. त्या म्हणजे अनन्या पांडे आणि शनाया कपूर सुहानाच्या जीवलग मैत्रिणी आहेत.
एका मुलाखतीत याबाबत अनन्याने शाहरूखच्या ( ShahRukh Khan ) लकी चार्मबाबत भाष्य केले आहे, ती म्हणाली की, कोलकाता नाईट रायडर्सने पहिली आयपीएल स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी शाहरूख यांनी मला, सुहाना आणि शनायाला त्यांचे लकी चार्म म्हटले होते. इतकेच नाही तर शनायाची आई महीप कपूर आणि अनन्याची आई भावना पांडे यांची शाहरूखची पत्नी गौरी खान हिच्याशी चांगली मैत्री आहे, हे विशेष!
Latest Marathi News अनन्या पांडे शाहरूख खानची लकी चार्म Brought to You By : Bharat Live News Media.