निवडणुकीच्या तोंडावर नेत्‍यांना अटक : उद्धव ठाकरे

निवडणुकीच्या तोंडावर नेत्‍यांना अटक : उद्धव ठाकरे

नवी दिल्‍ली ; Bharat Live News Media ऑनलाईन देशात हुकूमशाही आली आहे. मात्र आम्‍ही या हुकूमशाहीचा सामना जनतेच्या दरबारात करणार आहाेत. निवडणूक रोखेचा घोटाळा समोर आल्‍यानंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्‍यामुळे खरे ठग कोण हे निवडणूक रोख्यांमधून कळालं आहे. भाजपमध्ये सगळे भ्रष्‍ट घेतले आहेत. भाजपमधील सर्व ठगांच्या केसेस मागे घेतल्‍या जात असल्‍याचा आरोप करत, उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्‍लाबोल केला. पत्रकार परिषदेत ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी त्‍यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर सोरेन आणि केजरीवाल यांना सरकारने अटक केली आहे. देशात हुकूमशाही आली आहे. म्‍हणत भाजपवर टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांचा मी खर्च देतो, त्‍यांनी लडाख, मणीपूरमध्ये जावं असं ते म्‍हणाले. जागावाटपावर प्रश्न विचारताच, जागावाटपात खेचाखेची होतच असते, पण आता मविआत सर्व ठिक आहे असे ते म्‍हणाले. भाजपने राष्‍ट्रवादीतले सर्व ठग घेतले आहेत. भाजपमधील सर्व ठगांचे केसेस मागे घेत असल्‍याची टीकाही ठाकरे यांनी यावेळी भाजपवर केली.
हेही वाचा : 

Lok Sabha Election 2024 | दिल्लीश्वरांचा कौल ‘बाहुबली’ च्या बाजूने?

Lok Sabha Election 2024 : महायुतीचा चार-पाच जागांवर तिढा

महाराष्ट्रावर जलसंकट : मराठवाड्याच्या घशाला कोरड

Latest Marathi News निवडणुकीच्या तोंडावर नेत्‍यांना अटक : उद्धव ठाकरे Brought to You By : Bharat Live News Media.