जालना : अबंड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीसह कर्मचारी रंगेहाथ लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

अकबर शेख : अबंड शहर उपजिल्हा रुग्णालयातील  वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर लाचलुचपत विभागाने लाच घेतल्याप्रकरणी कारवाई केली. डॉ. शामकांत दत्तात्रय गावंडे (वय 49 वर्ष अंबड, जि. जालना)  व कनिष्ठ सहाय्यक पंडित भीमराव कळकुंबे (वय-42 वर्ष, अंबड) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  20 हजारांच्या लाचेची मागणी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार हे प्राथमिक … The post जालना : अबंड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीसह कर्मचारी रंगेहाथ लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

जालना : अबंड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीसह कर्मचारी रंगेहाथ लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

अकबर शेख : अबंड शहर उपजिल्हा रुग्णालयातील  वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर लाचलुचपत विभागाने लाच घेतल्याप्रकरणी कारवाई केली. डॉ. शामकांत दत्तात्रय गावंडे (वय 49 वर्ष अंबड, जि. जालना)  व कनिष्ठ सहाय्यक पंडित भीमराव कळकुंबे (वय-42 वर्ष, अंबड) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  20 हजारांच्या लाचेची मागणी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदार हे प्राथमिक आरोग्य केंद्र, वडीगोद्री व जामखेड ता. अंबड, जि जालना येथे वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोग्य शिबिराची बिले पडताळणी करून मंजुरी करिता पंचायत समिती अंबड, जालना येथे पाठविण्या करिता प्रती बिल 1000 रुपये प्रमाणे लचेची मागणी संशयित दोघांनी केली.
लाचेची रक्कम यातील आरोपी कनिष्ठ सहाय्यक यांने तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या सांगण्यावरून पंच व साक्षीदारा यांच्या समक्ष स्वतः स्वीकारली तालुका वैद्यकीय अधिकारी व कनिष्ठ सहाय्यक यांना ताब्यात घेऊन अबंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव, , पोलिस उप अधीक्षक राजीव तळेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हानुमत वारे,  पोहेका साईनाथ तोडकर , पोना. युवराज हिवाळे, पो. अंमलदार विलास चव्हाण या घटनेचा तपास करित आहेत.
Latest Marathi News जालना : अबंड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारीसह कर्मचारी रंगेहाथ लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात Brought to You By : Bharat Live News Media.