5 पाच हजार द्या, उतारा घ्या ; लाच घेताना ग्रामसेवकाला पकडले
पुणेः Bharat Live News Media वृत्तसेवा : वरसगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला पाच हजारांची लाच घेताना लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. विठ्ठल वामन घाडगे (वय 44) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. वडिलोपार्जीत मिळकत घराच्या क्षेत्राच्या नोंदी दुरुस्त करून संगणीकृत आठ अ चा उतारा देण्यासाठी घाडगेने 5 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी, 45 वर्षीय व्यक्तीने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार घाडगे याच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 मार्च रोजी विठ्ठल मंदिर भाजी मंडई कर्वे रोड कर्वेनगर येथील मातोश्री वृद्धाश्रमाच्या भिंतीलगतच्या कॉर्नरवरील एका पानटपरीसमोर ही कारवाई पथकाने केली आहे.
तक्रारदार यांचे वरसगाव, ता. वेल्हे येथे वडिलोपार्जीत मिळकत घर आहे. त्या मिळकतीच्या क्षेत्राच्या नोंदी दुरुस्त करून आईचे व त्यांचे स्वतःचे नावाचा संगणीकृत आठ अ चा उतारा हवा होता. हे काम करून देण्यासाठी ग्रामसेवक घाडगे यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. कर्वेगनर परिसरात सापळा लावून पथकाने घाडगे यांना तडजोडीअंती पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.
हेही वाचा
सेवा विकास बँके गैरव्यवहार प्रकरण : रोझरीचा संचालक विनय अर्हानाला बेड्या
Lok Sabha Election 2024 : ठाकरेंची साथ सोडणार का? अंबादास दानवेंनी स्पष्ट सांगितलं
वाहनचोरट्यांचं शहर! पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांची हवा..
Latest Marathi News 5 पाच हजार द्या, उतारा घ्या ; लाच घेताना ग्रामसेवकाला पकडले Brought to You By : Bharat Live News Media.