सराफ बाजारात ज्वेलर्सच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट, मोठा अनर्थ टळला
Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क : सराफ बाजारात एका ज्वेलर्सच्या दुकानात सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने कामगार दुकानात आले नसल्याने जीवित हानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील विकास ज्वेलर्स दुकानात सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की परिसरात मोठा हादरा बसला. दरम्यान दुकानात कामगार अद्याप आले नव्हते त्यामुळे जीवित हानी टळली. दुकानाचे शटर व काचा तुटून बाहेर आल्या आहेत. स्थानिकांचे दुकानात घरगुती सिलेंडर वापरला जात असल्याचे म्हणणे आहे. दरम्यान कोणालाही समजू नये म्हणून पटापट आवरा सावर करण्यात आली. सकाळची वेळ असल्याने रहदारी नव्हती, मोठा अनर्थ टळला.
Latest Marathi News सराफ बाजारात ज्वेलर्सच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट, मोठा अनर्थ टळला Brought to You By : Bharat Live News Media.