हातकणंगलेत महिलेचा गळा आवळून खून

हातकणंगलेत महिलेचा गळा आवळून खून

हातकणंगले, Bharat Live News Media वृत्तसेवा : येथे तीन दिवसांपूर्वी भाड्याने राहण्यास आलेल्या रूपाली दादासो गावडे (वय 28, रा. हिंगणगाव, ता. हातकणंगले) या महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा आहे.
ही महिला तीनच दिवसांपूर्वी प्रियकर प्रकाश शेखर हदीमणी (वय 35) याच्यासोबत हातकणंगले येथील अण्णा भाऊ साठे समाजमंदिरासमोर खोत यांच्या खोलीत राहण्यास आली होती. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह आढळून आला. याबाबतची फिर्याद नागेश धुंडाप्पा काळे यांनी हातकणंगले पोलिसांत दिली आहे.
प्रकाशला दारूचे व्यसन होते. यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. त्यातूनच मंगळवारी सकाळी वादावादी होऊन प्रकाश याने रूपाली हिचा दोरीने गळा आवळून खून केल्याचा संशय आहे. दरम्यान, सायंकाळी हदीमणी याला पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर, हेडकॉन्स्टेबल महादेव खेडकर, कृष्णा माने, स्वप्निल मोहिते करीत आहेत.
Latest Marathi News हातकणंगलेत महिलेचा गळा आवळून खून Brought to You By : Bharat Live News Media.