Crime News : गुटख्याचा साठा जप्त : पिकअपसह 31 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

बारामती : पुढारी वृत्तसेवा : उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे एका फार्म हाऊसवर लपवलेला गुटख्याचा साठा उघड करण्यात पोलिसांना यश आले. या वेळी पोलिसांनी छापा टाकून एका वाहनासह सुमारे 31 लाखाचा गुटखा जप्त करीत गुटखामाफियाला अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आज करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. प्रशांत धनपाल गांधी … The post Crime News : गुटख्याचा साठा जप्त : पिकअपसह 31 लाखांचा मुद्देमाल ताब्यात appeared first on पुढारी.

Crime News : गुटख्याचा साठा जप्त : पिकअपसह 31 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे एका फार्म हाऊसवर लपवलेला गुटख्याचा साठा उघड करण्यात पोलिसांना यश आले. या वेळी पोलिसांनी छापा टाकून एका वाहनासह सुमारे 31 लाखाचा गुटखा जप्त करीत गुटखामाफियाला अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आज करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. प्रशांत धनपाल गांधी (वय 48, रा. लासुर्णे, ता. इंदापूर, सध्या रा. ऋषिकेश अपार्टमेंट, फ्लॅट नं 1, पेन्शील चौक, बारामती) असे अटक केलेल्या गुटखामाफियाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 23) बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे येथील विद्युत सबस्टेशन नजीकच्या एका फार्म हाऊसवर पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये एका गुटखामाफियाला अटक करण्यात आली आहे. सुपे पोलिस स्टेशनंतर्गत ही पहिलीच सर्वात मोठी कारवाई झाली आहे.
बारामती एमआयडीसी हद्दीत एका गोडाऊनमध्ये राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी ठेवला जातो. तसेच तो जिल्ह्यातील विविध भागांत पुरवठा होत असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक दर्शन दुगल व त्यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार प्रशांत यांच्या घराची झडती घेतली असता तेथे मुद्देमाल मिळून आला नाही. त्यानंतर कसून चौकशी केली असता कर्नाटकमधील विजापूर येथील निसार (पूर्ण नाव माहिती नाही) याच्याकडून विक्रीसाठी आणलेला गुटखा यवत येथील राहुल मलबारी याला देण्याकरिता जात असताना वाहन रस्त्यात नादुरुस्त होऊन बंद पडले. त्यामुळे उंडवडी येथील स्वमालकीच्या फार्म हाऊसवर गुटखा ठेवल्याची माहिती गांधी याने दिली. त्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक दर्शन दुगल, सुप्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील व त्यांच्या पथकाने छापा टाकल्यावर एका पिकअप वाहनासह 31 लाख किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
दरम्यान, प्रशांत, निसार आणि राहुल मलबारी आदी गुटखामाफियांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. तर प्रशांत याला अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले असता त्याला बुधवार (दि. 27)पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस अधीक्षक दर्शन दुगड, सुपा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलिस उपनिरीक्षक योगेश घोडके, जिनेश कोळी, लेंडवे, जवान तुषार ढावरे, सुदर्शन डोळाळकर आदींनी ही कारवाई केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.
हेही वाचा

Nashik Crime | ये तो सुपर से भी उपर! फसवणुकीच्या पैशांची केली शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक
दुर्दैवी ! टेम्पोच्या धडकेत बालिका ठार; बाप-लेक जखमी
शिरूर शिक्षण मंडळाच्या 4 पदाधिकार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटी..

 
Latest Marathi News Crime News : गुटख्याचा साठा जप्त : पिकअपसह 31 लाखांचा मुद्देमाल ताब्यात Brought to You By : Bharat Live News Media.