‘उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पोर्न स्टार…’; कंगनाचा जुना व्हिडिओ व्हायरल

‘उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पोर्न स्टार…’; कंगनाचा जुना व्हिडिओ व्हायरल

Bharat Live News Media ऑनालईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले आहे. या कालावधीपासून कंगनाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. काल काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनी कंगना राणावतबाबत एक मोठे वादग्रस्त विधान केले होते. यानंतर कंगनानेही त्यावर सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. आता कंगनाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कंगना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही सॉफ्ट पोर्न स्टार असे म्हटलं आहे. ( Kangana Ranaut-Urmila Matondkar )
संबंधित बातम्या 

Kangana Ranaut on Supriya Shrinate: काँग्रेस नेत्याची ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट; कंगणा राणावत म्हणाली, स्त्री शरीराच्या…

Kangana Ranaut : कंगणाचा येतोय ‘क्वीन २’; चित्रीकरणाला लवकरच प्रारंभ
Kangana Ranaut Emergency : कंगना रानौतच्या ‘इमरजेन्सी’ची रिलीज डेट फिक्स

कंगना राणावतचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा २०२० सालचा जुना आहे. या व्हिडिओत कंगना एका टीव्ही चॅनेलला मुलाखत देताना दिसत आहे. या मुलाखतीत कंगनाने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर माझ्याबद्दल एक अत्यंत अपमानास्पद मुलाखत दिल्याचे मी पाहिले असल्याचे म्हटलं आहे. यावेळी ती ज्या पद्धतीने माझ्याबद्दल बोलत होती, माझ्या संघर्षाची खिल्ली उडवत होती. आणि शेवटी तिने मला निवडणूक तिकिट मिळण्यासाठी भाजप पक्षाकडून खूपच प्रयत्न करत असल्याचेही तिने म्हटलं होतं. यावर कंगनाने आता प्रत्युत्तर दिलं आहे.
यापुढे कंगना म्हणाली की, ‘माझ्यासाठी निवडणुकीचे तिकीट मिळवणे फार कठीण नाही हे समजून घेण्यासाठी खूपच बुद्धीमान, प्रतिभावान असण्याची गरज नाही. उर्मिला एक सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. ती तिच्या अभिनयासाठी ओळखली जात नाही तर ती कशासाठी ओळखली जाते हे मला माहित आहे?. ती फक्त सॉफ्ट पॉर्नसाठीच ओळखली जाते, हिच तिची ओळख खरी आहे. तिला तिकिट मिळत असेल तर, मला का तिकिट मिळू शकत नाही? असा सवाल ही तिने यावेळी केला आहे.
दरम्यान काल काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीणेत यांच्या सोशल मीडियावर अभिनेत्री कंगनाचा एक फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘कोणी सांगू शकेल का की बाजारात काय किंमत आहे?’. या पोस्टनंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर कंगनाने याचे जोरदार प्रत्युत्तर दिलं. ‘कलाकार म्हणून माझ्या गेल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत मी सर्व प्रकारच्या महिलांच्या भूमिका केल्या आहेत.’ असे कंगनाने म्हटलं होत. ( Kangana Ranaut-Urmila Matondkar)

कंगना रनौत जो नेशनल टीवी पर उर्मिला मातोंडकर को “सॉफ्ट पॉर्न स्टार” कह रही है,
क्या यह महिला का अपमान नही??#KanganaRanaut pic.twitter.com/s9qbALPRsD
— Dilpreet kaur (@dilsarkaria) March 26, 2024

Dear Supriya ji
In the last 20 years of my career as an artist I have played all kinds of women. From a naive girl in Queen to a seductive spy in Dhaakad, from a goddess in Manikarnika to a demon in Chandramukhi, from a prostitute in Rajjo to a revolutionary leader in Thalaivii.… pic.twitter.com/GJbhJTQAzW
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 25, 2024

Latest Marathi News ‘उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पोर्न स्टार…’; कंगनाचा जुना व्हिडिओ व्हायरल Brought to You By : Bharat Live News Media.