एक दुनिया अनोखी!

बीजिंग : जगाच्या पाठीवर अनेक अनोखी द़ृश्ये पाहायला मिळत असतात. अनेक ठिकाणांपर्यंत माणूस पोहोचलेलाही नाही. पृथ्वीवरील अनेक गोष्टींपासून माणूस अनभिज्ञ आहे. अनेक रहस्यं अद्यापही उलगडलेली नाहीत. चीनमध्ये एक 650 फूट खोल सिंकहोल सापडला आहे. या सिंकहोलमध्ये एक वेगळीच दुनिया आहे. चीनमध्ये सापडलेल्या या 650 फूट खोल खड्ड्यात स्वतःची इको सिस्टीम आहे. या सिंकहोलमध्ये प्राचीन जंगल … The post एक दुनिया अनोखी! appeared first on पुढारी.

एक दुनिया अनोखी!

बीजिंग : जगाच्या पाठीवर अनेक अनोखी द़ृश्ये पाहायला मिळत असतात. अनेक ठिकाणांपर्यंत माणूस पोहोचलेलाही नाही. पृथ्वीवरील अनेक गोष्टींपासून माणूस अनभिज्ञ आहे. अनेक रहस्यं अद्यापही उलगडलेली नाहीत. चीनमध्ये एक 650 फूट खोल सिंकहोल सापडला आहे. या सिंकहोलमध्ये एक वेगळीच दुनिया आहे. चीनमध्ये सापडलेल्या या 650 फूट खोल खड्ड्यात स्वतःची इको सिस्टीम आहे. या सिंकहोलमध्ये प्राचीन जंगल आढळले आहे.
चिनी संशोधकांना ‘जियोपार्क’मध्ये भूमिगत रहस्य सापडले आहे. या घटनेला चीनमध्ये तियानकेंग म्हटले जाते. हा सिंकहोल चीनच्या नैऋत्य भागातील गुआंग्शीमध्ये आहे. या भागात अनेक गुहा आहेत. जगातील सर्वात लांब नैसर्गिक पुलासाठी हा भाग ओळखला जातो. सिंकहोलमध्ये संशोधकांना अनेक अज्ञात वनस्पती आणि प्राणी आढळले आहेत. चीनमध्ये असे 30 सिंकहोल आहेत. सिंकहोलच्या खाली एक संरक्षित जंगल आहे. सिंकहोलची लांबी 306 मीटर, तर रुंदी 150 मीटर आहे. सिंकहोलमध्ये असलेली झाडं जवळपास 40 मीटर उंच आहेत. सिंकहोल दिसायला एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे आहे.
सिंकहोल आकाराने मोठे असल्याने त्याच्या आत सूर्यप्रकाश अगदी सहज जातो. त्यामुळे आत असलेली झाडं, वेली व्यवस्थित वाढतात. संशोधक, शास्त्रज्ञांच्या दृष्टीनं सिंकहोल अतिशय महत्त्वाचा आहे. त्यात अनेक रहस्यमय प्रजाती आढळण्याची शक्यता आहे. चिनी नागरिक अशा खड्ड्यांना दैवी मानतात. चिनी भाषेत त्यांना तियांकेंग म्हटले जाते. त्याचा अर्थ स्वर्गाचा खड्डा असा होतो. या ठिकाणी तीन अंतहीन गुफा आहेत. त्यातून सतत पाण्याचा प्रवाह सुरू असतो. या पाण्याचा स्रोत कोणता, याचे उत्तर कोणाकडेच नाही. पाण्याचा प्रवाह अतिशय जास्त असल्याने उगमस्थान कोणालाच माहीत नाही.
Latest Marathi News एक दुनिया अनोखी! Brought to You By : Bharat Live News Media.