संगीतप्रेमींचे माहेरघर : दुर्मीळ दहा रागांचा अनमोल खजिना
नाशिक: आनंद बोरा
नाशिकरोडच्या बिटको फॅक्टरीजवळील लोकमान्यनगरातील शालिनी बंगला म्हणजे जणू संगीतप्रेमींचे माहेरघरच… या बंगल्याचे मालक प्रसिद्ध वास्तुविशारद सुनील आहेर आणि त्यांच्या पत्नी सुजाता आहेर यांनी तब्बल एक लाखांपेक्षा अधिक गाण्यांचा संग्रह केला आहे. असे एकही गाणे नसेल ते त्यांच्या संग्रहात नसेल. याचबरोबर 4000 ओडिओ कॅसेट, पाच हजार एलपी रेकॉर्ड, दोन हजार ईपी रेकॉर्ड, 78 आरपीएमच्या दीड हजार रेकॉर्ड, तर ऑडिओ सीडी तीन हजारांच्या आसपास बघावयास मिळतात. जुन्या नव्या गाण्यांवर चर्चा व्हावी ती ऐकता यावी यासाठी या बंगल्यात दर रविवार संगीतप्रेमींची मैफिल आयोजित केली जाते.
सुनील आणि सुजाता या जोडीने गेल्या वीस वर्षांत तब्बल लाखाच्या वर गाणी जमा केली आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, गझल, रामायण सर्व काही येथे ऐकण्यास मिळते. 1981 मध्ये यांनी संग्रहाला सुरुवात केली. चार हजार ऑडिओ रेकॉर्ड, पाच हजार एलपी रेकॉर्ड, दोन हजार ईपी रेकॉर्ड, 78 आरपीएमच्या पंधराशे, तर तब्बल तीन हजार ऑडिओ सीडी त्यांनी जमविल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व गाणी त्यांच्याकडे असल्याचा दावा ते करतात. हे ऐकण्यासाठी त्यांच्याकडे 15 ते 20 सिस्टिमदेखील आहे. पूर्वी कॅसेट कंपनी विविध प्रकारच्या रेकॉर्ड बाजारात आणत. गोल्डन सिरिजच्या रकॉर्ड त्यांनी संग्रहित करून ठेवल्या आहेत. यामध्ये सुरैय्या, आशा भोसले, रफी, देवानंद, रामचंद्र, येशुदास, सलीम चौधरी यांच्या सीडी बघावयास मिळतात.
१८७६ पासूनचे जुने रेकॉर्ड
या संग्रहालयात 1913 चा ड्रम रेकॉर्ड तसेच 1938 मधील 78 आरपीएम बनविलेली लाखाची रेकॉर्ड त्यांच्याकडे बघावयास मिळते. त्याचप्रमाणे ग्रामोफोन कॉन्सर्ट रेकॉर्डदेखील त्यांच्याकडे आहे. अलाहबादच्या जानकी रॉय यांचे 1939 मधील गाणे ऐकण्याचा दुर्मीळ योग येथे येतो. तसेच बुगडी माझी, सांगते ऐका..सारखी पन्नास वर्षांपूर्वीची गाणी येथे ऐकावयास मिळतात. 1876 चा दुर्मीळ ग्रामोफोन, 1972 मधील स्टुडिओ रेकॉर्डिंगकरिता वापरला जाणारा स्पुल टेपदेखील त्यांच्याकडे आहे. या रेकॉर्डरपासून मास्टर रेकॉर्ड तयार केल्या जातात.
हरिभाऊ पटवर्धन यांच्या दुर्मीळ दहा रागांचा अनमोल खजिना
संग्रहात 50 ते 60 च्या शतकातील सर्व गायकांच्या सीडी आहेत. माणिक वर्मा, कृष्णा कोल्हे, रजनी जोशी, कान्होपत्रा किनीकर, निर्मला गोगटे, मधुवंती दांडेकर यांच्या गाण्यांना ऐकता येईल, तसेच 1934 मधील हरिभाऊ पटवर्धन यांचा 78 आरपीएमवरील दहा रागांची आती दुर्मीळ ओरिजनल वीस सेटचा संग्रह बघावयास मिळतो. हा संग्रह केवळ नाशिकमध्ये त्यांच्याचकडे असल्याचे ते सांगतात. कोलंबिया कंपनीचे अधिकारी त्यांच्या घरी येऊन या सीडीचे रेकॉर्डिंग करून घेऊन गेले, असे ते सांगतात. तसेच राजकमल प्रॉडक्शनच्या सीडीदेखील त्यांनी जपून ठेवल्या आहेत. या सीडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही कंपनी दुसऱ्यांचे रेकॉर्ड कधीच वापरत नसे.
या आहेत दुर्मीळ सीडी
* सैगल यांच्या सर्व गाण्यांचा सेट
* कीर्तनकार चारूदत्त आफळे
* परवीन बॉबीचा धून की लकिर पहिला चित्रपट
* म्युझिक डायरेक्टर शाम सुंदर
* आशा भोसले यांची सर्व गाणी
* सलील चौधरी आणि गुलजार हे एकत्र केवळ एकदाच आले त्यांची मैने तेरे लियेची सीडी
* 1946 चा दशकातील फरिदा खातम यांची सीडी
* पंकज उधास यांची सर्व गाणी
* जगदीश सिंग, अनुपम जलोटा यांची सर्व गाणे
* म्युझिक डायरेक्टर वसंत देसाई
* लक्ष्मीकांत यांचे गुरू हुस्नलाल भगतराम यांची कॅसेट
* सुमन कल्याणपूरकर यांचे भावगीत
दर रविवार भरते मैफिल
संगीतप्रेमींना हे गाणे ऐकता यावे यासाठी येथे दर रविवार मैफिल भरते. आजपर्यंत सुनीलभाईंना वसंतराव देशपांडे, लता मंगेशकर, सुधीर फडके, सुरेश वाडकर, अमित विश्वास यांना भेटण्याचा योग आल्याचे ते सांगतात. तसेच ते व्हिंटेज कारचे दिवाणे असून, त्यांनी 1962 मधील स्टमुर्द हेरॉल्ड कंपनीची मेड इन इंग्लंड गाडी होती. या गाडीचे सर्व इन्टेरियर त्यांनी स्वतः बनविले होते. त्यावेळी त्यांना बक्षीसदेखील मिळाले होते.
ही जुनी गाणी नव्या पिढीला ऐकता यावी यासाठी संगीत म्युझियम बनविण्याची इच्छा आहे. तसेच दर रविवार होणारी मैफिल वाढवून गाणे, गझल गाणार्या गायकांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करीत असून, देशभरातील अनेक संगीतप्रेमींना मी मार्गदर्शनदेखील करीत आहे. – सुनील आहेर.
नाशिक : शालिनी बंगला म्हणजे जणू संगीतप्रेमींचे माहेरघरच… या बंगल्याचे मालक प्रसिद्ध वास्तुविशारद सुनील आहेर आणि त्यांच्या पत्नी सुजाता आहेर.
Latest Marathi News संगीतप्रेमींचे माहेरघर : दुर्मीळ दहा रागांचा अनमोल खजिना Brought to You By : Bharat Live News Media.