ग्रुप स्टडी : यशस्वी होण्याची शिडी, जाणून घ्या याविषयी

महाविद्यालयीन जीवनात बहुतांश विद्यार्थी गट अभ्यासाचा पूरेपूर फायदा उचलताना दिसून येतात. शालेय जीवनात देखील अनेक मित्र एकत्र अभ्यास करताना दिसतात. अभ्यासादरम्यान येणार्‍या अडीअडचणी सोडवण्यासाठी गट अभ्यास हा फायदेशीर ठरतो. एखादा विद्यार्थी कच्चा असतो तर दुसरा विद्यार्थी हुशार असतो. यातून अवघड वाटणारा विषय, संकल्पना, रचना, या बाबी हुशार मुलांच्या मदतीने सोडवणे सोपे जाते. गट अभ्यासाच्या सवयीमुळे … The post ग्रुप स्टडी : यशस्वी होण्याची शिडी, जाणून घ्या याविषयी appeared first on पुढारी.

ग्रुप स्टडी : यशस्वी होण्याची शिडी, जाणून घ्या याविषयी

सतीश जाधव

महाविद्यालयीन जीवनात बहुतांश विद्यार्थी गट अभ्यासाचा पूरेपूर फायदा उचलताना दिसून येतात. शालेय जीवनात देखील अनेक मित्र एकत्र अभ्यास करताना दिसतात. अभ्यासादरम्यान येणार्‍या अडीअडचणी सोडवण्यासाठी गट अभ्यास हा फायदेशीर ठरतो. एखादा विद्यार्थी कच्चा असतो तर दुसरा विद्यार्थी हुशार असतो. यातून अवघड वाटणारा विषय, संकल्पना, रचना, या बाबी हुशार मुलांच्या मदतीने सोडवणे सोपे जाते. गट अभ्यासाच्या सवयीमुळे वाचन, लिखाणात सातत्य राहते.
चालढकलपणावर उपाय : नियमित गट अभ्यासामुळे विद्यार्थ्यांत अभ्यासाची गोडी वाढते. ते ठरावीक वेळेतच अभ्यास करत असल्याने अभ्यासाबाबत कोणीही चालढकलपणा करत नाही. जर तुम्ही एकट्याने अभ्यास करत असाल तर आजचा अभ्यास संध्याकाळी, संध्याकाळचा अभ्यास उद्यावर ढकलतो. परिणामी अभ्यासात सातत्य राहात नाही आणि आपण अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडत जातो. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नांची उकल करून देण्यासाठी प्रत्येक वेळी पालक घरी असतीलच असे नाही. अशा स्थितीत प्रलंबित प्रश्नांची यादी वाढत जाते. मात्र तुम्ही अभ्यास गटात सामील असाल तर मित्र-मैत्रिणींच्या मदतीने अभ्यास पूर्ण करू शकता आणि अभ्यास करताना कंटाळाही येत नाही. तसेच अभ्यास गटामुळे अभ्यासाला दांडी मारण्याची शक्यता राहात नाही. जर तुम्हालाही अभ्यासाचा कंटाळा येत असेल तर वर्गातील एखाद्या अभ्यास गटामध्ये सामील व्हा.
नवीन दृष्टिकोन मिळतो : जर तुम्ही एकट्यानेच अभ्यास करत असाल तर उपलब्ध शैक्षणिक साहित्याच्या मदतीने आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. ठरावीक आणि साचेबद्ध उत्तर तयार करण्याची सवय आपल्याला लागते. ही पद्धत चुकीची नाही आणि मार्कही कमी पडत नाहीत. परंतु आपण त्यातून आऊट ऑफ बॉक्स विचार करत नाहीत. परंतु अभ्यास गटाच्या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध होऊ शकते. प्रत्येक विद्यार्थ्यांचा द़ृष्टिकोन समजू शकतो. यातून आपला वेगळा द़ृष्टिकोन तयार होऊ शकतो. एकाच प्रश्नावर अनेक मार्गांनी आपण उत्तर निर्माण करू शकतो. यातून कल्पनाशक्तीचा विकास होतो. साचेबद्ध उत्तराऐवजी आपण आकर्षक मांडणीतून उत्तराचे सादरीकरण करू शकतो.
अभ्यासाचे नवीन कौशल्य हस्तगत : अभ्यास गटाच्या मदतीने अभ्यासाचे नवे तंत्र, कौशल्य, पद्धती अवगत करू शकतो. कॉलेजदशकात प्रत्येक विद्यार्थी हा आपापल्या पद्धतीने अभ्यासाचे कौशल्य विकसित करत असतो. मात्र आपल्या कौशल्यात आणखी भर घातली तर ते काम अतिशय उत्कृष्टपणे सादर होऊ शकते. एखाद्या अभ्यास गटात सहभागी होऊन आपल्या अभ्यासाच्या कक्षा व्यापक करू शकतो. अभ्यासाच्या पद्धतीचे एकमेकांना शेअरिंग केल्यास आपल्यातील उणिवा दूर करण्यास मदत मिळू शकते. अन्य विद्यार्थ्याच्या अभ्यासाची चांगली पद्धत अवलंबल्यास अभ्यास अधिकच अचूक आणि योग्य दिशेने जावू शकतो.
एकाकीपणा कमी होतो : अभ्यास गटाच्या मदतीने एकाकीपणा कमी होतो. बराच काळ एकट्याने अभ्यास केल्यास उत्साह राहात नाही. पुन्हा अभ्यासाला बसायचे झाल्यास आपण कंटाळा करतो. परंतु अभ्यास गटात अभ्यासाची वेळ समजत नाही. तसेच काही वेळ ब्रेक घेऊन अनौपचारिक चर्चा, गप्पा मारल्यानंतर आपण ताजेतवाने होतो आणि पुन्हा अभ्यासाला लागतो. परीक्षेच्या काळात बरीच मंडळी एकत्ररीत्या अभ्यास करतात. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करताना ब्रेक म्हणून कँटीन, बस स्थानक, रेल्वे स्थानक अशा गजबजलेल्या ठिकाणी फेरी मारून क्षीण घालवतात. आपण एकट्यानेच केलेल्या अभ्यासाने कंटाळा आल्यास आपल्यासमोर झोपण्याशिवाय पर्याय राहात नाही.
Latest Marathi News ग्रुप स्टडी : यशस्वी होण्याची शिडी, जाणून घ्या याविषयी Brought to You By : Bharat Live News Media.