स्वच्छता अभियानामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त

स्वच्छता अभियानामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त

नाशिक (सिडको ): Bharat Live News Media वृत्तसेवा
सिडकोतील ‘संभाजी स्टेडियम दुर्दशेने सिडकोत संताप’ या शीर्षकाखाली संभाजी स्टेडीयमची दुर्दशा व स्वच्छतागृहचे दुर्गंधीयुक्त पाणी ट्रॅकवर या समस्यांची दै. Bharat Live News Mediaतील बातमीची मनपा आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेतली. तसेच मनपातर्फे संभाजी स्टेडीयमवर स्वच्छता अभियान सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
सिडकोतील संभाजी स्टेडीयमवर ट्रॅकजवळ स्वच्छता गृह आहे. मात्र येथील स्वच्छता गृहाचे दुर्गंधीयुक्त पाणी थेट ट्रॅकवर येत होत. त्यामुळे सकाळी व सायंकाळी ट्रॅकवर फिरावयास येणारे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त दैनिक Bharat Live News Mediaने प्रसिध्दीस आणले. तसेच ट्रॅकवर पाणी मारलेले नसल्याने धूळीचे साम्राज्य जैसे थे आहे. या संभाजी स्टेडीयम वरील समस्या दै. Bharat Live News Mediaत प्रसिद्ध झाल्याने बातमीची दखल घेऊन मनपा सिडको विभागीय आरोग्य अधिकारी संजय गांगुर्डे यांनी त्वरीत कर्मचारी पाठवून स्टेडीयमवर स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याने सामाजिक कार्यकर्ते अंकुश वराडे यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Latest Marathi News स्वच्छता अभियानामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त Brought to You By : Bharat Live News Media.