मंत्री गिरीश महाजन यांची मुक्ताईनगर भूमिपूजन कार्यक्रमाला दांडी

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री हे मुक्ताईनगर मध्ये भूमिपूजन करण्यासाठी आलेले असतानाही या कार्यक्रमाला जिल्ह्याचे भाजपाचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगरच्या कार्यक्रमाला दांडी मारली. मात्र खेडी येथील वारकरी भवनाचे उद्घाटन वेळी मात्र उपस्थित होते यावरून गिरीश महाजन यांनी कोणते संकेत दिले.
राज्याचे संकट मोचक व नेहमी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सोबत राहणारे जळगाव जिल्ह्याचे भाजपाचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर च्या कार्यक्रमाला दांडी मारली. या दांडीमागील मुख्य कारण होते. शहरात पाच रोजी भाजपाचे सर्वेसर्वा अमित शहा यांच्या आगमन होणार आहे, तर पुन्हा मुक्ताईनगरला जाऊन कोणत्या नवीन वादाला तोंड फोडण्यापेक्षा आपल्या कामाकडे लक्ष देण्यासाठी व मुक्ताईनगरला न जाता जळगाव खेडी येथील वारकरी भावनांच्या उद्घाटनाला त्यांनी उपस्थिती दिली.
वारकरी भावनाच्या उद्घाटनाला उपस्थित देऊन त्यांनी मुक्ताईनगरला अनुपस्थिती दिली यावर मात्र त्यांनी कोणतेही कारण न सागता योग्य समजले
Latest Marathi News मंत्री गिरीश महाजन यांची मुक्ताईनगर भूमिपूजन कार्यक्रमाला दांडी Brought to You By : Bharat Live News Media.
