धक्कादायक! कॅफेत जेवल्यानंतर माऊथ फ्रेशनर्स घेतलेल्या पाच जणांना रक्ताच्या उलट्या, हरियाणातील घटना
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : माऊथ फ्रेशनर्सचा वापर लोक चांगल्या जेवणानंतर मूड ताजेतवाने करण्यासाठी करतात. मात्र हरियाणाच्या गुरुग्राममधील एका कॅफेमध्ये जेवणानंतर माउथ फ्रेशनरचे सेवन केल्याने पाच जणांना तोंडातून रक्त येऊ लागल्याची घटना घडली. एनडिटिव्हीने दिलेल्या माहितीनंतर पंजाबमध्ये खळबळ उडाली. या घटनेची पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. (Gurugram Cafe)
पोलिसात नोंदवलेल्या एफआयआरनुसार, 2 मार्च रोजी रात्री 9:30 वाजता अंकित कुमार त्याच्या पत्नी आणि मित्रांसह गुरुग्रामच्या खेरकिदौला सेक्टर 90 मधील लाफोरेस्टा रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. रात्रीच्या जेवणानंतर त्यांना माउथ फ्रेशनर देण्यात आले. ते खाल्ल्यानंतर पाच जणांच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाचही लोक काहीतरी खाल्ल्यानंतर अस्वस्थ झालेले दिसत आहेत. तोंडात रक्तस्त्राव होत असल्याने वेदना होत असल्याचे स्पष्ट होते. (Gurugram Cafe)
हरियाणामधील गुरुग्राममधील या कॅफेमधील ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेवणानंतर या सर्वांनी माऊथ फ्रेशनरचे सेवन केले. मात्र माऊथ फ्रेशनरच्या सेवनानंतर त्यांना वेदना आणि अस्वस्थ वाटू लागले. ते जोरजोराने किंचाळत रडताना आहेत. या सर्वांना जिभेला त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. एक तरुणी तर चक्क बर्फ तोंडात ठेवून होत असलेल्या त्रासापासून मुक्तता मिळवत असल्याचे दिसून आले.
NDTV ला अमित कुमार या तरुणाने दिलेल्या प्रतिक्रिये मध्ये म्हटले आहे की “कॅफेवाल्यांनी माउथ फ्रेशनरमध्ये काय मिसळले आहे हे आम्हाला माहित नाही. पण माउथ फ्रेशनरच्या घेतल्यानंतर इथल्या प्रत्येकाला उलट्या होत आहेत. आमच्या जिभेवर जखमा झाल्या आहेत. तोंड जळजळत आहे. त्यांनी आम्हाला कोणत्या प्रकारचे ऍसिड दिले आहे ते माहित नाही” . यानंतर त्याने कॅफेमधील लोकांना पोलिसांना बोलावण्यास सांगितले.
Five people started vomiting blood and reported a burning sensation in their mouths after eating mouth freshener after their meal at a cafe in Gurugram. They were hospitalized and two are critical. pic.twitter.com/brMnbWbZQW
— Waquar Hasan (@WaqarHasan1231) March 4, 2024
हेही वाचा
SBI Electoral Bonds : इलेक्टोरल बॉण्ड्स प्रकरणी SBI ची सुप्रीम कोर्टात धाव, माहिती देण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढीची मागणी
Navi Mumbai News : नवी मुंबईत ६६ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना उत्तर प्रदेशातून अटक
Gujarat Accident : वडोदरानजीक भीषण अपघात, चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील पाच ठार
Latest Marathi News धक्कादायक! कॅफेत जेवल्यानंतर माऊथ फ्रेशनर्स घेतलेल्या पाच जणांना रक्ताच्या उलट्या, हरियाणातील घटना Brought to You By : Bharat Live News Media.