२० लाखांच्या लाचखोरी प्रकरणी एनएचएआयच्या आणखी दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : प्रलंबित बिले मंजूर करण्यासाठी एकूण रकमेपैकी २० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने रविवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) महाव्यवस्थापक अरविंद काळे यांचेसह तिघांना अटक केली होती. याप्रकरणी सीबीआयने सोमवारी एनएचएआयच्या आणखी दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक केली. त्यामुळे आता अटक झालेल्या अधिकाऱ्यांची संख्या ६ वर पोहोचली आहे. सीबीआयने सोमवारी दिवसभर मध्यप्रदेशात एनएचएआयच्या … The post २० लाखांच्या लाचखोरी प्रकरणी एनएचएआयच्या आणखी दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक appeared first on पुढारी.

२० लाखांच्या लाचखोरी प्रकरणी एनएचएआयच्या आणखी दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : प्रलंबित बिले मंजूर करण्यासाठी एकूण रकमेपैकी २० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने रविवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) महाव्यवस्थापक अरविंद काळे यांचेसह तिघांना अटक केली होती. याप्रकरणी सीबीआयने सोमवारी एनएचएआयच्या आणखी दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक केली. त्यामुळे आता अटक झालेल्या अधिकाऱ्यांची संख्या ६ वर पोहोचली आहे. सीबीआयने सोमवारी दिवसभर मध्यप्रदेशात एनएचएआयच्या अधिकाऱ्यांची कार्यालये, निवासस्थानासह १६ ठिकाणी झाडाझडती केली. यावेळी २ कोटीपेक्षा जास्त बेहिशोबी रक्कम हाती लागली.आरोपींना सोमवारी भोपाळ येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नागपूर येथील एनएचएआय महाव्यवस्थापक आणि प्रकल्प संचालक अरविंद काळे, मध्यप्रदेशातील हरदा येथील एनएचएआय उपमहाव्यवस्थापक आणि प्रकल्प संचालक ब्रिजेशकुमार साहू, मेसर्स बन्सल कन्स्ट्रक्शन वर्क्स प्रा.लि.चे संचालक अनिल बन्सल आणि कुणाल बन्सल, मेसर्स बन्सल कन्स्ट्रक्शन वर्क्स प्रा. लि. कंपनीचे कर्मचारी सी. कृष्णा (लाच देणारे) आणि छतरसिंग लोधी, एनएचएआयचे भोपाळ येथील उप महाव्यवस्थापक आणि प्रकल्प संचालक राजेंद्रकुमार गुप्ता आणि एनएचएआयचे मध्यप्रदेशातील विदिशा येथील प्रकल्प संचालक हेमंतकुमार यांचा समावेश आहे.
सापळ्यातील रकमेसह सीबीआयने एकूण २ कोटीपेक्षा जास्त रक्कम जप्त केली. यासोबतच संशयास्पद कागदपत्रे, कॉम्प्यूटर, लॅपटॉप, मोबाईलसह सोन्याचे दागिनेही जप्त केले.
Latest Marathi News २० लाखांच्या लाचखोरी प्रकरणी एनएचएआयच्या आणखी दोन बड्या अधिकाऱ्यांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.