पुणे महापालिकेची शाळा नंबर वन; पीसीएमसी दुसर्‍या क्रमांकावर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक सरकारी शाळा गटात वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, साखरा आणि खासगी शाळा गटात नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल (बेळगाव ढगा) शाळेने पटकावले आहे. त्याचप्रमाणे सरकारी गटात द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हेदवली (ता. कर्जत, जि. रायगड), तृतीय क्रमांक जिल्हा परिषद … The post पुणे महापालिकेची शाळा नंबर वन; पीसीएमसी दुसर्‍या क्रमांकावर appeared first on पुढारी.

पुणे महापालिकेची शाळा नंबर वन; पीसीएमसी दुसर्‍या क्रमांकावर

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक सरकारी शाळा गटात वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, साखरा आणि खासगी शाळा गटात नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल (बेळगाव ढगा) शाळेने पटकावले आहे. त्याचप्रमाणे सरकारी गटात द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हेदवली (ता. कर्जत, जि. रायगड), तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा, घालेवाडी (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) यांनी मिळविला. महापालिका गटात पुण्यातील डॉ. यशवंत गणपत शिंदे विद्यानिकेतन 19 नंबर शाळेने प्रथम, तर पीसीएमसी क्रीडा प्रबोधिनीला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
खासगी शाळा गटात शारदानगर येथील शारदाबाई पवार विद्या निकेतनने (ता. बारामती) द्वितीय आणि भोंडवे पाटील शाळा, बजाजनगर, जि. छत्रपती संभाजीनगर शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. राज्यभरातील शाळांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी, शाळा सुंदर शाळा या अभियानाची 1 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली होती. 45 दिवसांच्या या उपक्रमामध्ये 15 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थीकेंद्री व शाळा व्यवस्थापन आयोजित उपक्रम अशा दोन प्रकारांमध्ये शाळांचे विविध स्तरावर मूल्यमापन करण्यात आले. या अभियानात 64 हजार 312 सरकारी शाळा आणि 39 हजार खासगी शाळांचा समावेश आहे.
या शाळांमधील एक कोटी 99 लाख 61 हजार 586 विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये एक कोटी 4 लाख 64 हजार 420 विद्यार्थी, 94 लाख 97 हजार 166 मुलींचा सहभाग होता. राज्य सरकारमार्फत दिली जाणारी ही पुरस्काराची रक्कम मोठी आहे. मुंबईमध्ये मंगळवारी (दि.5) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत बक्षीस वाटप कार्यक्रम होणार आहे. तालुका ते राज्यस्तरावर शाळांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असून, 1 ते 51 लाख रुपयांची बक्षिसे या निवडलेल्या शाळांना देण्यात येणार आहेत. खासगी व स्थानिक स्वराज्य संस्था अशा दोन विभागांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती.
राज्यस्तरीय परितोषिक विजेत्या शाळा
प्रथम जि.प. शाळा, साखरा (जि. वाशिम) इस्पॅलिअर हेरिटेज स्कूल, नाशिक, द्वितीय जिप प्राथमिक शाळा, हेदवली, जि. रायगड, शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर (जि. पुणे). तृतीय जि.प. शाळा, धालेवाडी (जि. सांगली) भोंडवे पाटील शाळा, बजाजनगर (जि. छत्रपती संभाजीनगर)
‘गिनीज बुक’ने घेतली दखल
वाचन चळवळीमध्ये 18 लाख विद्यार्थ्यांनी वाचन सवय प्रतिज्ञेमध्ये सहभाग घेतला असून, शिक्षणविषयक हस्तलिखित स्पर्धेत 13 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून एका दिवसात हस्ताक्षरातील अभिप्रायांचा फोटो संकेतस्थळावर अपलोड केला आहे. याची दखल गिनीज बुकमार्फत घेण्यात आली असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
हेही वाचा

मँचेस्टर पोलिस खात्यात 6 फुटी अश्व!
वेध शेअर बाजाराचा | जीडीपीची कमाल, बाजारात धमाल
‘मविआ’मध्ये ‘वंचित’ आवश्यक : शरद पवार

Latest Marathi News पुणे महापालिकेची शाळा नंबर वन; पीसीएमसी दुसर्‍या क्रमांकावर Brought to You By : Bharat Live News Media.