गुजरात टायटन्सने ३.६ कोटी रूपयांना विकत घेतलेल्या खेळाडूचा अपघात

गुजरात टायटन्सने ३.६ कोटी रूपयांना विकत घेतलेल्या खेळाडूचा अपघात

अहमदाबाद : वृत्तसंस्था : आयपीएल २०२४ पूर्वी गुजरात टायटन्ससाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. संघाचा स्टार खेळाडू रॉबिन मिन्झचा अपघात झाला आहे. आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावात गुजरातने रॉबिनला ३.६ कोटी रुपये देऊन विकत घेतले होते. रॉबिन आयपीएलमध्ये विकला जाणारा पहिला आदिवासी खेळाडू आहे. हा २१ वर्षांचा खेळाडू बाईकवरून जात असताना त्याचा अपघात झाला. सध्या तो रुग्णालयात आहेत.
मिन्झ त्याची कावासाकी सुपरबाईक चालवत असताना नियंत्रण सुटल्यानंतर दुसऱ्या बाईकला जाऊन धडकला. मात्र, रॉबिनला फारशी दुखापत झाली नाही. त्याला किरकोळ दुखापत झाली असली तरी त्याच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. मिन्झची प्रकृती गंभीर नसून, सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. दुचाकीच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून, मिन्झच्या उजव्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
मिन्झचे वडील रांची विमानतळावर सुरक्षारक्षक आहेत. त्यावेळी त्याचा एकदा सामना महेंद्रसिंह धोनीशी झाला होता. धोनीने मिन्झच्या वडिलांना वचन दिले होते की, जर आयपीएल २०२४ च्या लिलावात रॉबिनला कोणीही खरेदी केले नाही, तर चेन्नई सुपर किंग्ज त्याला खरेदी करेल. लिलावात चेन्नई सुपर किंग्जने मिन्झसाठी बोली लावली. या फ्रँचायझीने बोली १.२० कोटी रुपयांपर्यंत वाढवली; पण नंतर ती सोडून दिली. नंतर मुंबई इंडियन्स, गुजरात आणि सनरायझर्स हैदराबादनेही रॉबिन मिन्झसाठी बोली लावली. शेवटी गुजरातने त्याला ३.६० कोटी रुपयांना विकत घेतले.
हेही वाचा : 

टीम इंडिया WTC Points Table मध्‍ये अव्‍वल स्‍थानी
बंगाल क्रिकेटमध्ये फिक्सिंगचे वारे?
‘अय्यर-किशनवरील कारवाई योग्यच, BCCIच्या निर्णयाचे स्वागत’

Latest Marathi News गुजरात टायटन्सने ३.६ कोटी रूपयांना विकत घेतलेल्या खेळाडूचा अपघात Brought to You By : Bharat Live News Media.