अंकिता, भजन उपउपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ अँटेलिया येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक पात्र फेरीच्या शेवटच्या तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीचा पहिल्या फेरीतील अनपेक्षित पराभवानंतर अंकिता भक्त आणि भजन कौर यांनी प्रतिस्पर्ध्यावर मात करत उपउपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. या पात्र फेरीच्या अंतिम स्पर्धेत महिला विभागातील वैयक्तिक गटात पहिल्याच फेरीत अझहर बेजानच्या रेमाझेनोव्हा भारताच्या दीपिका कुमारीचा 6-4 असा पराभव केला. त्यानंतर भारताच्या अंकिता भक्त […]

अंकिता, भजन उपउपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ अँटेलिया
येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक पात्र फेरीच्या शेवटच्या तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीचा पहिल्या फेरीतील अनपेक्षित पराभवानंतर अंकिता भक्त आणि भजन कौर यांनी प्रतिस्पर्ध्यावर मात करत उपउपांत्यफेरीत प्रवेश मिळविला.
या पात्र फेरीच्या अंतिम स्पर्धेत महिला विभागातील वैयक्तिक गटात पहिल्याच फेरीत अझहर बेजानच्या रेमाझेनोव्हा भारताच्या दीपिका कुमारीचा 6-4 असा पराभव केला. त्यानंतर भारताच्या अंकिता भक्त आणि भजन कौर यांनी आपले सामने जिंकले. अंकिताने पहिल्या फेरीच्या लढतीत इस्त्राइलच्या शेली हिल्टनचा 6-4 तर त्यानंतर दुसऱ्या फेरीतील लढतीत तिने इस्त्रइलच्या मिकेला मोशेचा 7-3 असा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळविले. भारताच्या तृतीय मानांकित भजन कौरला तिसऱ्या फेरीमध्ये पुढे चाल मिळाली. त्यानंतरच्या सामन्यात तिने मंगोलियाच्या बिशेनडीचा 6-2 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या या शेवटच्या पात्र फेरीच्या तिरंदाजी स्पर्धेत कोटा पद्धतीनुसार भारतीय पुरुष आणि महिला संघांना आपली पात्रता सिद्ध करता आली नाही. दरम्यान भारतीय पुरुष संघाला मानांकनात टॉप सिडींग मिळूनही त्यांना उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मेक्सिकोकडून हार पत्करावी लागली. तर महिलांच्या विभागात भारतीय महिला संघाला मानांकनात पाचवे स्थान मिळाले होते. पण उपउपांत्यपूर्व फेरीतच भारतीय महिला तिरंदाजी संघाला हार पत्करावी लागली. पॅरिस ऑलिम्पिकसाठी स्थान मिळविण्याची भारतीय महिला संघाला अद्याप संधी आहे. पण 24 जूनपर्यंत भारतीय महिला तिरंदाजी संघाने आपले मानांकनातील सध्याचे स्थान राखने गरजेचे आहे.