भारतीय रेल्वेचे नाव ‘लिम्का बुक’मध्ये नोंद

भारतीय रेल्वेचे नाव ‘लिम्का बुक’मध्ये नोंद

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रेल्वेने एक मोठी कामगिरी करून आपले नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदवले आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक सेवा कार्यक्रमांना सर्वाधिक लोक उपस्थित राहिल्याने रेल्वेने हे यश संपादन केले आहे. रेल्वे मंत्रालयाने 26 फेब्रुवारी 2024 रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. देशातील एकूण 2,140 ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये 40 लाख 19 हजार 516 लोकांनी सहभाग दर्शवला होता. या कामगिरीची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन रेल्वेच्या विविध पुलांचे उद्घाटन आणि रेल्वे स्थानकांच्या पायाभरणीसाठी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय रेल्वेच्या या मोठ्या प्रयत्नात लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.