लवलीना बोर्गोहेनला रौप्यपदक

लवलीना बोर्गोहेनला रौप्यपदक

वृत्तसंस्था/ लाबेम
झेकप्रजासत्तकमधील लाबेम येथे झालेल्या ग्रा. प्री. महिलांच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत 75 किलो वजन गटात भारताच्या लवलीना बोर्गोहेनला रौप्यपदक मिळाले.
महिलांच्या 75 किलो वजन गटातील खेळविण्यात आलेल्या सुवर्णपदकाच्या लढतीत चीनच्या ली क्वीयानने लवलीनाचा 3-2 अशा गुणांनी पराभव केला. या पराभवामुळे लवलीनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. लवलीनाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट लवलीनाने यापूर्वीच आरक्षित केले आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत भारताचे 6 मुष्टियोद्धे पात्र ठरले आहेत. 26 वर्षीय लवलीना सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे.