महामेळाव्याच्या खटल्याची सुनावणी लांबणीवर

बेळगाव : म. ए. समितीच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महामेळाव्यामुळे दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण झाले म्हणून टिळकवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या खटल्याची सुनावणी शुक्रवारी होती. या खटल्यामध्ये असलेले सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र न्यायालयाने पुन्हा हा खटला पुढे ढकलला असून 15 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. म. ए. समितीच्यावतीने 2021 […]

महामेळाव्याच्या खटल्याची सुनावणी लांबणीवर

बेळगाव : म. ए. समितीच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महामेळाव्यामुळे दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण झाले म्हणून टिळकवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या खटल्याची सुनावणी शुक्रवारी होती. या खटल्यामध्ये असलेले सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र न्यायालयाने पुन्हा हा खटला पुढे ढकलला असून 15 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. म. ए. समितीच्यावतीने 2021 साली व्हॅक्सिन डेपो परिसरातील रस्त्यावरच मेळावा भरविण्यात आला. त्यामुळे टिळकवाडी पोलीस स्थानकामध्ये मनपाच्या तत्कालीन साहाय्यक अभियंता मंजुश्री यांनी तक्रार दिली आहे.
दीपक दळवी, शुभम शेळके, प्रकाश मरगाळे, मदन बामणे, माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश शिरोळकर, सचिन केळवेकर, सुनील बोकडे, माजी महापौर सरिता पाटील, श्रीकांत कदम, रेणू किल्लेकर, दिलीप बैलूरकर, बापू भडांगे, राजू चौगुले, बाबु कोल्हे, राकेश पलंगे, शिवाजी सुंठकर, अनिल आंबरोळी, पियुष हावळ, सूरज कुडुचकर, दत्ता उघाडे, मनोहर हलगेकर, मनोहर हुंदरे, सूरज कणबरकर, संतोष मंडलीक, धनंजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व जण शुक्रवारी उपस्थित होते. मात्र या खटल्याची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. कार्यकर्त्यांच्यावतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. वैभव कुट्रे हे काम पाहत आहेत.