अदानी पोर्ट्सचा 24 जूनला सेन्सेक्समध्ये होणार समावेश

आयटी कंपनी विप्रो बाहेर : अदानी पोर्ट्स 6 महिन्यात 45 टक्क्यांनी मजबूत वृत्तसंस्था/ मुंबई अदानी पोर्ट्सचे शेअर्स 24 जूनपासून बीएसई सेन्सेक्सवर व्यवहार करणार आहेत. अदानी समूहाची कंपनी विप्रोची जागा घेणार आहे. 30 शेअर्सच्या निर्देशांक सेन्सेक्समध्ये वेळोवेळी बदल केले जातात. या अंतर्गत सेन्सेक्समध्ये अदानी पोर्ट्सचा समावेश करण्यात येत असून विप्रोला वगळण्यात येत आहे. सेन्सेक्समध्ये समाविष्ट झालेल्या […]

अदानी पोर्ट्सचा 24 जूनला सेन्सेक्समध्ये होणार समावेश

आयटी कंपनी विप्रो बाहेर : अदानी पोर्ट्स 6 महिन्यात 45 टक्क्यांनी मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
अदानी पोर्ट्सचे शेअर्स 24 जूनपासून बीएसई सेन्सेक्सवर व्यवहार करणार आहेत. अदानी समूहाची कंपनी विप्रोची जागा घेणार आहे. 30 शेअर्सच्या निर्देशांक सेन्सेक्समध्ये वेळोवेळी बदल केले जातात. या अंतर्गत सेन्सेक्समध्ये अदानी पोर्ट्सचा समावेश करण्यात येत असून विप्रोला वगळण्यात येत आहे.
सेन्सेक्समध्ये समाविष्ट झालेल्या अदानी समूहातील कंपन्यांमध्ये अदानी पोर्ट्स ही पहिली कंपनी आहे. अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स, अदानी समूहाची प्रमुख कंपनी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) च्या निफ्टी 50 मध्ये समाविष्ट आहेत.
अदानी पोर्ट्स मजबूत तर विप्रोचा प्रवास शांतच
अदानी पोर्ट्सचे शेअर्स सुमारे अर्धा टक्का वाढून 1480 रुपयांवर व्यवहार करत आहेत. गेल्या 6 महिन्यांत, स्टॉकने 45 टक्केपेक्षा जास्त परतावा दिला आहे. त्याचवेळी, शेअरची किंमत एका वर्षात जवळपास दुप्पट झाली आहे. हा शेअर 749 रुपयांवरून 1480 रुपयांवर गेला आहे.
विप्रोचे शेअर्स शुक्रवारी 1 टक्के पेक्षा जास्त वाढीसह 495 रुपयांवर व्यवहार करत आहेत. गेल्या 6 महिन्यांत स्टॉकने केवळ 14 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, एका वर्षात स्टॉक 28 टक्केपेक्षा जास्त वाढला आहे. हा शेअर 385 रुपयांवरून 495 रुपयांवर गेला आहे.
सेन्सेक्स देशातील टॉप 30 कंपन्यांचा मागोवा घेतो. सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा बेंचमार्क निर्देशांक आहे, जो देशातील मुख्य 30 कंपन्यांचा मागोवा घेतो. सेन्सेक्सची गणना फ्री-फ्लोट कॅपिटलायझेशनच्या आधारे केली जाते. सेन्सेक्सचे समभाग वेळोवेळी बदलत राहतात. त्यासाठी दर सहा महिन्यांनी आढावा घेऊन त्याआधारे निर्णय घेतला जातो.